Home /News /heath /

चांगल्या कामासाठी जाताना खा दही-साखर? हे आहे त्यामागचं शास्त्रीय कारण

चांगल्या कामासाठी जाताना खा दही-साखर? हे आहे त्यामागचं शास्त्रीय कारण

आयुर्वेदात दह्याचं सेवन आरोग्यासाठी चांगलं असल्याचं सांगितलं आहे.

आयुर्वेदात दह्याचं सेवन आरोग्यासाठी चांगलं असल्याचं सांगितलं आहे.

दही हे पचायला हलकं असतं. दह्यात व्हिटॅमीन (Vitamin), प्रोटीन (Protein) आणि कॅल्शिअमही (Calcium) असतं. दह्याने पोटाच्या समस्या दूर होतात आणि पचनशक्ती सुधारते.

    नवी दिल्ली, 7 जून :  लहानपणापासूनच आपण पाहत असतो, जेव्हा आपण एखाद्या शुभ कार्यासाठी घराबाहेर जातो त्यावेळेस आपली आई किंवा घरातली मोठी माणसं त्या व्यक्तीच्या हातावर दही-साखर (Sugar & Curd) देतात. दही-साखरेमुळे यश (Success) मिळतं असं आई किंवा आजीचं म्हणणं असतं. आपण कितीही चिडचिड, कटकट केली तरीदेखील ते आपल्या हातावर दही साखर ठेवतात. बऱ्याचदा जेव्हा मुलं इंटरव्ह्यूसाठी (Interview) जातात, परीक्षेसाठी (Exam) जातात किंवा आपले वडील एखाद्या कामासाठी घराबाहेर जातात तेव्हा त्यांच्या हातावर दही-साखर दिली जाते. मात्र, या पाठीमागे काही शास्त्रीय कारणं (Scientific Reasons) देखील आहेत. दही पचायला हलकं - दही पचायला हलकं असतं (Easy to Digest). त्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन बी 12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात. जे शारीरासाठी आवश्यक असतात. दही शरीरासाठी सुपरफूड आहे. आयुर्वेदानुसार देखील दही-साखर खाण्याचे काही फायदे आहेत. (फेसबुकवरील वादाचा बदला,मोठ्या बहिणीच्या मदतीने सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार) आयुर्वेदानुसार फायदे - दही हे थंड प्रकृतीचं आहे. त्यामुळेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर थंड करण्याचं काम ते करतं. तर, साखरेमध्ये ग्लुकोज असतं. (SCचा निर्णय; बिल्डरने वेळेवर घर दिलं नाही तर व्याजासह द्यावी लागेल संपूर्ण रक्कम) जेव्हा दही आपल्या पोटामध्ये जातं तेव्हा, आपल्या शरीराला थंडावा मिळतो. तर, साखरेमुळे आपल्याला ऊर्जा मिळते. त्यामुळे परीक्षा किंवा जॉब इंटरव्ह्यूसाठीला जाताना दही साखर खाण्यामुळे आपला मेंदू आणि मन शांत राहतं आणि शरीरामध्ये उर्जा निर्माण होते.
    First published:

    पुढील बातम्या