जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 'आमचे ब्लाउज ओढले, खासदारांना खाली पाडले', उत्तर प्रदेश पोलिसांचा आणखी एक प्रताप समोर, VIDEO

'आमचे ब्लाउज ओढले, खासदारांना खाली पाडले', उत्तर प्रदेश पोलिसांचा आणखी एक प्रताप समोर, VIDEO

'आमचे ब्लाउज ओढले, खासदारांना खाली पाडले', उत्तर प्रदेश पोलिसांचा आणखी एक प्रताप समोर, VIDEO

राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना ताजी असताना आता तृणमूलच्या खासदारांनाही धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

उत्तर प्रदेश, 02 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये निर्भयावर झालेल्या सामूहिक बलात्कार हत्या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना ताजी असताना आता तृणमूलच्या खासदारांनाही धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे. हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना सांत्वन करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन, ममता ठाकुर यांच्यासह इतर नेते गावात पोहोचले होते. पण, पोलिसांनी त्यांना गावाच्या सीमेवर रोखले. यावेळी पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी खासदार डेरेक ओ ब्रायन यांना धक्काबुक्की करून बाहेर काढले. या धुमश्चक्रीत डेरेक ब्रायन हे जमिनीवर खाली कोसळले. एवढंच नाहीतर महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी बाहेर ढकलले.

जाहिरात

तृणमूल काँग्रेसच्या नेता ममता ठाकुर यांनी सांगितले की, ‘उत्तर प्रदेश महिला पोलिसांनी आमच्यासोबत धक्काबुक्की केली. त्यावेळी त्यांनी आमचे ब्लाउज ओढले, आमच्या खासदारांवर लाठीचार्ज केला आणि जमिनीवर पाडले. पुरूष पोलिसांनी सुद्धा आमच्यासोबत चुकीचा व्यवहार केला, हा प्रकार अत्यंत किळसवाणा होता’

राहुल आणि प्रियांका गांधींवर गुन्हा दाखल दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरस इथे जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. या प्रकरणात आता राहुल गांधींसह 200 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी उशिरा ग्रेटर नोएडा इथे पोलिसांनी काँग्रेसच्या 200 नेत्यांविरोधात FIR दाखल केला. कलम 144 चं उल्लंघन केल्याप्रकरणी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांविरोधात कलम 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या आधी काँग्रेसच्या नेत्यांना हाथरस इथे पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यापासून रोखण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात