याला Love Jihad म्हणायचं की काय? : हिंदू तरुणीशी विवाह करण्यासाठी मुस्लिमाने केलं धर्मांतर!

याला Love Jihad म्हणायचं की काय? : हिंदू तरुणीशी विवाह करण्यासाठी मुस्लिमाने केलं धर्मांतर!

या दोघांचं हिंदू रीतीरिवाजानुसार लग्न झालं. यावेळी तरुणाने धर्माबरोबरच त्याचं नावही बदललं.

  • Share this:

चंदीगड 2 डिसेंबर :  देशात सध्या ‘लव्ह जिहाद’च्या (Love Jihad) च्या मुद्यावर राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप (BJP) शासित मध्य प्रदेशने यावर कायदा आणला. उत्तर प्रदेशात योगी सरकारही त्याच मार्गावर आहे.  हरियाणा (Haryana) राज्याने या प्रकरणात कायदा आणण्याची तयारी सुरू केलीय. त्याच वेळी हरियाणात एक बरोबर उलटा प्रकार पाहायला मिळाला. एका मुस्लीम तरुणाने हिंदू तरुणीशी लग्न करण्यासाठी हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. या प्रकरणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या (Punjab and Haryana High Court) आदेशानंतर दाम्पत्याला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे.

हरयाणातील यमुनानगर जिल्ह्यातील ही घटना आहे. या जिल्ह्यातील 21 वर्षाचा मुस्लीम तरुण आणि 19 वर्षाच्या हिंदू तरुणींचे परस्परांवर प्रेम होतं. त्यांच्या लग्नात धर्माचा अडथळा  होता. या विरोधाची पर्वा न करता दोघांनी 9 नोव्हेंबर रोजी हिंदू रीतीरिवाजानुसार लग्न केले. यावेळी तरुणाने धर्माबरोबरच त्याचं नावही बदललं.

विवाहानंतर या दाम्पत्याने मुलीच्या कुटुंबीयापासून संरक्षण मिळावं यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. विवाहास विरोध करणे हे घटनेच्या कलम 21 अन्वये मिळालेल्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचा दावा त्यांनी केला होता.

भाजप सरकार कायद्यावर ठाम!

‘लव्ह जिहाद’ प्रकरणात कायदा करण्यासाठी हरयाणातील भाजपचे सरकार ठाम आहे. या प्रकरणात कायदा बनवण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती हरयणाचे गृहमंत्री अनिल विज (Anil Vij) यांनी मागच्या आठवड्यात दिली होती.

Published by: News18 Temp
First published: December 2, 2020, 6:48 PM IST

ताज्या बातम्या