नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : केंद्र सरकार देशातील साखरेच्या दरावर बारीक लक्ष ठेवून आहे. साखरेचे भाव वाढू नयेत यासाठी सरकारने नियोजन सुरू केले आहे. देशांतर्गत पुरवठा आणि नियंत्रण दर सुनिश्चित करण्यासाठी सरकार सप्टेंबर 2023 पर्यंत साखर निर्यातीचा कोटा कमी करू शकते. सरकार 2021-22 मध्ये साखर निर्यातीचा कोटा 11.2 दशलक्ष टनांवरून 9 दशलक्ष टनांपर्यंत कमी करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे.
मनीकंट्रोलने ब्लूमबर्गच्या हवाल्याने म्हटले आहे की, सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या ब्राझीलमध्ये पावसामुळे उसाच्या गाळपातील मंदीमुळे जागतिक साखरेच्या पुरवठ्यात घट झाली आहे. यासंबंधित सूत्रांनी सांगितले की, नवी दिल्ली पूर्वी केवळ 8 दशलक्ष टन साखर निर्यातीस परवानगी देण्याची योजना आखत होती, परंतु आता साखरेच्या देशांतर्गत अतिरिक्त साठ्याच्या शक्यतेमुळे थोडी अधिक साखर निर्यातीस परवानगी दिली जाऊ शकते.
अनेक टप्प्यात निर्यात -
साखर निर्यातीचा कोटा कमी करण्याबाबत वाणिज्य मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यासंबंधित माहिती असलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, उत्पादनाच्या गतीनुसार, पहिल्या टप्प्यात 6 दशलक्ष टन आणि दुसऱ्या टप्प्यात 3 दशलक्ष टन निर्यात करण्याची परवानगी देण्याचा सरकार विचार करत आहे.
हेही वाचा - पाम तेलावरील आयात करात मोठी वाढ, तुमच्यावर काय होणार परिणाम?
भारताने साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लादले -
यापूर्वी भारतातून साखरेच्या निर्यातीवर कोणतेही बंधन नव्हते. परंतु, देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि किमती नियंत्रणात राहण्यासाठी सरकारने गेल्या वर्षी साखर निर्यातीवर मर्यादा घातल्या होत्या. साखर निर्यातीवरील निर्बंध पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने गेल्या शनिवारी घेतला होता. दरम्यान, युरोपियन युनियन आणि यूएसमध्ये निर्यात केल्या जाणार्या साखरेवरील निर्बंध काही विशिष्ट कोट्यांतर्गत लागू होत नाहीत.
35.5 दशलक्ष टन साखर उत्पादन -
इंडियन शुगर मिल्स असोसिएशननुसार, यावर्षी भारतात साखरेचे उत्पादन 35.5 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. 2020-21 मध्ये ब्राझीलनंतर हा देश सर्वात मोठा साखर निर्यात करणारा देश होता. भारतीय साखरेचे प्रमुख खरेदीदार इंडोनेशिया, बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती आहेत. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यातदार तसेच जगातील सर्वात मोठा साखरेचा ग्राहक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Sugar