Home /News /news /

महिला कर्मचाऱ्यांना Google सुद्धा देतं होतं कमी पगार; समान वेतनाचा लढा 5 वर्षं होता सुरू

महिला कर्मचाऱ्यांना Google सुद्धा देतं होतं कमी पगार; समान वेतनाचा लढा 5 वर्षं होता सुरू

महिला कर्मचाऱ्यांना Google सुद्धा देतं होतं कमी पगार; समान वेतनाचा लढा 5 वर्षं होता सुरू

महिला कर्मचाऱ्यांना Google सुद्धा देतं होतं कमी पगार; समान वेतनाचा लढा 5 वर्षं होता सुरू

गेल्या पाच वर्षांपासून गुगलमधील महिला समान वेतन (Equal salary right) मिळावं यासाठी कोर्टात लढाई लढत होत्या. अखेर, गुगलने आता वाटाघाटी (Google to negotiate over salary bias) करण्याची तयारी दाखवली आहे. काय आहे हे प्रकरण वाचा.

मुंबई, 15 जून:  आज 21 व्या शतकात महिला पुरूषांसोबत सर्व क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. असं असताना, कित्येक ठिकाणी अजूनही एकाच कामासाठी पुरूषांना महिलांच्या तुलनेत अधिक पगार (Gender bias at workplace) दिला जातो. जगातील सर्वांत मोठी टेक कंपनी असलेल्या गुगलमध्येही अशाच प्रकारची वागणूक (Google Gender bias in Salary) दिली जात असल्याच्या आरोपांमुळे ही कंपनी चर्चेत आहे. गेल्या पाच वर्षांपासून गुगलमधील महिला समान वेतन (Equal salary right) मिळावं यासाठी कोर्टात लढाई लढत होत्या. अखेर, गुगलने आता वाटाघाटी (Google to negotiate over salary bias) करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे गुगल आता सुमारे 15 हजार महिला कर्मचाऱ्यांना 118 मिलियन डॉलर्स एवढी रक्कम देणार आहे. 2017 पासून सुरू होती कायदेशीर लढाई 2013 सालापासून गुगलच्या कॅलिफोर्नियातील ऑफिसमध्ये काम करणाऱ्या चार महिला कर्मचाऱ्यांनी 2017 साली कंपनीविरुद्ध खटला दाखल (Case Against Google over gender bias) केला होता. कॅली एलिस, होली पीज, कॅली विसुरी आणि हेईडी लॅमर यांचा असा दावा होता, की कंपनीत एकाच पदावर कार्यरत असूनही पुरूषांच्या तुलनेत त्यांना कमी पगार दिला (Gender bias at workplace) जातो आहे. या महिलांनी केलेल्या दाव्यात म्हटलं होतं, की एकच काम करणाऱ्या, समान अनुभव असणाऱ्या पुरूषांना 21 डॉलर्स प्रतितास, तर महिलांना 18.51 डॉलर्स प्रतितास एवढा पगार देण्यात येत होता. दैनिक भास्करने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हेही वाचा - इंटरनेटच्या बॉसचा उलटा प्रवास! वयाच्या 19 ला स्टार्टअप, 26 ला Microsoft नंतर कॉलेजमध्ये घेतला प्रवेश पाच वर्षांनी कंपनी नमली पाच वर्षांपासून हा खटला सुरू होता. यादरम्यान बऱ्याच वेळा वाटाघाटी करण्याचे प्रस्तावही मांडले गेले, मात्र कंपनी त्यासाठी नकार देत होती. अखेर गुगलने संमती दर्शवताच सॅनफ्रान्सिस्कोच्या सर्वोच्च न्यायालयाने वाटाघाटीसाठी परवानगी (Google gets permission to negotiate in gender bias case) दिली. यानंतर आता 14 सप्टेंबर 2013 पासून गुगलमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या सुमारे 15,500 महिलांना कंपनी भरपाई देणार आहे. या प्रत्येक महिलेला सुमारे 7,612 डॉलर्स (सुमारे 5.94 लाख रुपये) एवढी रक्कम मिळेल. गुगलने आरोप फेटाळले वाटाघाटी करण्यास होकार दर्शवला असला, तरी गुगलने लिंगभेद (Google gender bias) करत असल्याचे आरोप फेटाळले आहेत. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना योग्य वेतन देण्यासाठी कटिबद्ध आहोत. गेल्या नऊ वर्षांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना योग्य वेतन, बोनस आणि इक्विटी मिळावी हे सुनिश्चित करण्यासाठी एक कठोर सॅलरी इक्विटी विश्लेषण आम्ही करत आहोत; असं गुगलच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं. दरम्यान, या वाटाघाटीनंतर आता एका वेगळ्या इंडस्ट्रिअल संस्थेचा सायकॉलॉजिस्ट गुगलच्या हायरिंग प्रोसेसची तपासणी करणार आहे. त्याने दिलेल्या अहवालानुसार कर्मचाऱ्यांना पगार दिला जाणार आहे. या निर्णयावर आणि वाटाघाटीवर कॅली एलिस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या वाटाघाटी स्त्री-पुरूष समानतेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
First published:

Tags: Google

पुढील बातम्या