कोरोनाच्या उपचारासंदर्भात चांगली बातमी, दिल्लीतील चाचणीला आलं मोठं यश

कोरोनाच्या उपचारासंदर्भात चांगली बातमी, दिल्लीतील चाचणीला आलं मोठं यश

एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने चिंता निर्माण झाली असतानाच दिल्लीतून एक चांगली बातमी आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 एप्रिल : सध्या देशात करोनानं थैमान घातलं आहे. देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सरकारकडून मोठी पावलं उचलण्यात येत आहेत. तरीही कोरोना व्हायरस ग्रस्तांची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणू ग्रस्तांचा देशात 23 हजाराचा टप्पा पार झाला आहे.

देशात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 23 हजार 077 इतकी झाली आहे. तर 4 हजार 749 रुग्ण बरे झाले आहेत. तर 718 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 1हजार 684 नवीन प्रकरणे तर 24 तासांत 37 मृत्यू झाला आहे.

काय आहे दिलासादायक माहिती?

एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने चिंता निर्माण झाली असतानाच दिल्लीतून एक चांगली बातमी आली आहे. कोरोनावरील उपचारांच्या शोधात एक दिलासायक माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या उपचारात दिल्लीला मोठे यश आलं आहे. दिल्लीत प्लाझ्मा थेरपीची चाचणी घेण्यात आली. याबाबतची प्रारंभिक चाचणी निकाल सकारात्मक आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत: पत्रकार परिषदेत सुरुवातीच्या निकालाबाबत माहिती देणार आहेत. दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची डिजिटल पत्रकार परिषद होणार आहे.

हेही वाचा- '...तर तो अपराध होईल', आदित्य ठाकरेंबाबत निलेश राणेंनी उपस्थिती केली 'ही' शंका

दरम्यान, कोरोनाच्या मुद्दय़ावर केंद्र सरकारचीही बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन देशातील विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. 3 मे रोजी लॉकडाउन -2 पूर्ण होण्यापूर्वी ही महत्त्वपूर्ण बैठक मानली जात आहे. या बैठकीत कोरोनाची स्थिती व सज्जता यावर राज्यांशी चर्चा केली जाईल.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 24, 2020, 11:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading