Home /News /maharashtra /

'...तर तो अपराध होईल', आदित्य ठाकरेंबाबत निलेश राणेंनी उपस्थिती केली 'ही' शंका

'...तर तो अपराध होईल', आदित्य ठाकरेंबाबत निलेश राणेंनी उपस्थिती केली 'ही' शंका

निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता आपला मोर्चा शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे वळवला आहे.

    मुंबई, 24 एप्रिल : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीच्या मुद्द्यावरून निलेश राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता आपला मोर्चा शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे वळवला आहे. निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी परिसरातील कोरोनाबाधितांच्या संख्येबाबत गंभीर शंका उपस्थित केली आहे. 'आदित्य ठाकरेचा मतदारसंघ Gसाऊथ मुंबईमध्ये येतो. अचानक कंटेनमेंट झोनमधून या वरळी भागाला वगळून सांगण्यात येत आहे की 9 दिवसांपासून एकही नवीन रुग्ण आढळला नाही. हे खरं असेल तर आनंद आहे. पण हा भाग फक्त आदित्यचा मतदारसंघ आहे म्हणून बातमी देऊन कोण झाकायचा प्रयत्न करत असेल तर तो अपराध होईल,' अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. याधीही केली आहे विखारी टीका राणे कुटुंब आणि शिवसेनेत वारंवार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. त्यातच ट्विटरवर सक्रिय असलेले निलेश राणे शिवसेना आणि शिवसेनेचं नेतृत्व यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका करत असतात. 'कोण आला रे कोण आला PR टीमचा वाघ आला. मुख्यमंत्र्याच्या PR टीमचं अभिनंदन, खूप मेहनत घेत आहात आपण. महाराष्ट्र असाच तुम्ही चालवला तर लवकरच लोकं चपलेने आभार मानतील तुमचे. या सरकारमध्ये ठेकेदार कचरा विकून श्रीमंत होत आहेत. त्यांना कोणाची भीती वाटत नाही. कारण त्यांना माहीत आहे कार्यवाही झाली तरी पैसे देऊन सुटू शकतो. ठाकरे नाही ठेकेदार सरकार आलं आहे,' अशी टीका नुकतीच निलेश राणे यांनी केली होती. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Nilesh rane

    पुढील बातम्या