पंढरपूर, 21 सप्टेंबर : राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. कोर्टातून आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. अशात मनसेने लोकल सुरू करण्याच्या मागणीनंतर मराठा समाज्याचा बाजूने आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मनसे मैदानात उतरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर आंदोलन करणार असा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रेंनी दिला आहे. सोलापूर जिल्हा बंद आंदोलनात मनसे सक्रिय सहभाग घेतला आहे. पण जर आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर मनसे आक्रमक आंदोलन करणार असा इशारा मनसेकडून करण्यात आला आहे. गनिमी कावा पद्धतीनं आंदोलन यशस्वी केल्यानंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया राज्य सरकारच्या विरोधात जागोजागी आंदोलन करण्यात येत आहे. सोलापूरमध्ये तर पहिली जिल्हांबदीही करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या संघटनांनी आज सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे. मात्र आज पहाटे पासून माढा, निमगाव पाटी इथं मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. इतकंच नाही तर पंढरपूर-पुणे मार्गही आंदोलकांनी रोखला आहे. Gold Price: आठवड्याच्या पहिल्या दिवशी महागलं सोनं, पाहा काय आहेत आजचे भाव मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यानंतर समाज संतप्त झाला आहे. आज सोलापूरच्या ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केला आहे. आज सकाळी पंढरपूर-पुणे मार्ग मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरला. निमगाव पाटी इथे टायर जाळून वाहतूक बंद केली आहे. आरक्षण प्रश्नी पंढरपूर माढा माळशिरस येथील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 24 तासांत तब्बल 87 हजार लोकांना झाला कोरोना, मृत्यूचीही धक्कादायक आकडेवारी समोर माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडेपाच वाजताच टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतरचा मराठा संघटनांनी पुकारलेला राज्यातील हा पहिलाच बंद असणार आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.