नरेश पारीक, प्रतिनिधी चुरू, 12 मे : प्रेम हे आंधळ असतं असं उगाच म्हटलं जात नाही. राजस्थानमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. 3 महिन्यापूर्वी झालेल्या ओळखीतून 19 वर्षांच्या तरुण आणि 18 वर्षांची तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडले. पण कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे दोघांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. ही घटना राजस्थानमधील चुरू येथील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. हे दोघेही आता पोलीस स्टेशनमध्ये मुक्काम ठोकून आहे. आपल्या जीवाचं काही बरं वाईट होईल, या भीतीने दोघेही पोलीस स्टेशनमध्ये मदतीची मागणी करत आहे. चुरू इथं राहणार अमन आणि मनीषा अशी या तरुण आणि तरुणीचे नवा आहे. दोघांची भेट ही 3 महिन्याआधी मार्केटमधील एका जनरल स्टोअरमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. दोघे एकमेकांना पसंत करू लागले. (1500 रुपयांसाठी रक्ताचं नातं विसरला, मुलाने आई-वडील आणि भावाला संपवलं, अखेर…) ओळखीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. त्यामुळे दोघांनी आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली. पण ही बाब मनिषाच्या कुटुंबीयांना समजली. कुटुंबीयांनी दोघांच्या नात्याला नकार दिला. जर सोबत राहिले तर जीव ठार मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे दोघेही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले.
मुळात लग्नाचं वय न झाल्यामुळे पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला. अमन आणि मनिषा दोघेही 9 वी पर्यंत शिकलेले होते. अमनचे कुटुंबीय हे दोघांच्या नात्यासाठी सहमत होते. पण, मनिषाच्या कुटुंबीयांचा कडाडून विरोध होता. दोघेही लग्नासाठी तयार होते. पण, वय अडवे येत होते. त्यातच तरुणीच्या कुटुंबीयांनी वारंवार धमक्या दिल्या. त्यामुळे परिस्थिती चिघळली होती. मुळात अमन हा 19 वर्षाचा आहे. तर मनिषा 18 वर्षांची आहे. त्यामुळे कायदेशीररित्या दोघांचंही लग्न होऊ शकत नाही. लग्नासाठी त्यांना दोन वर्ष वाट पाहावी लागणार आहे. पण या तणावपूर्ण परिस्थितीत आम्हाला संरक्षण द्या, अशी मागणीच दोघांनी केली.