जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पाच मुलींना द्यावी लागेल 'कोरोनाची अग्निपरीक्षा', वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

पाच मुलींना द्यावी लागेल 'कोरोनाची अग्निपरीक्षा', वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

पाच मुलींना द्यावी लागेल 'कोरोनाची अग्निपरीक्षा', वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटलेल्या 5 मुलींना कोरोनाच्या ‘फायर टेस्ट’मधून जावं लागलं. कोरोनाच्या चौकशीसाठी या पाच मुलींचा नमुना पाठवण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

गोरखपूर, 3 मे : देशभरात कोरोना विषाणूचा हाहाकार माजला आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत देशभरात 35 हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. शेकडो लोक मरण पावले आहेत. पण हे रोखण्यासाठी कोरोना वॉरियर्स दिवस रात्र काम करत आहेत. अधिकाधिक लोकांची कोरोना चौकशी केली जात आहे. दरम्यान, गोरखपूर (उत्तर प्रदेश) मध्ये एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. दैनिक हिंदुस्तान या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटलेल्या 5 मुलींना कोरोनाच्या ‘फायर टेस्ट’मधून जावं लागलं. कोरोनाच्या चौकशीसाठी या पाच मुलींचा नमुना पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल आणि मगच त्यांना घरी पाठवलं जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरमध्ये पाच महिलांचं अपहरण करण्यात आलं होतं. लॉकडाऊन करण्यापूर्वी आणि नंतर पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मोठ्या हिम्मतीने सर्व महिलांचा बचाव केला. यानंतर त्यांना आशा केंद्रात ठेवण्यात आलं. आता या मुलींची कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली आहे. कुलभूषण जाधव यांना सोडवण्यासाठी पाकिस्तानशी बॅक-चॅनल चर्चा: हरीश साळवे कोर्टाने निर्देशानुसारच घरी पाठवले जाईल या पाच मुलींना ल़ॉकडाऊनमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं स्थानिक पोलीस स्टेशननं सांगितलं. त्यांच्या वैद्यकीय तपासणीबरोबरच 164चे विधान नोंदवल्यानंतरच त्यांना कोर्टाच्या सूचनेनुसार घरी पाठवलं जाऊ शकतं. अशा परिस्थितीत, जर या मुलींना बीना कोरोनाची तपासणी करता घरी पाठवलं तर कोरोना विषाणू बर्‍याच लोकांमध्ये पसरू शकतो. यामुळेच या मुलींची कोरोना तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. अहवाल मिळाल्यानंतरच, पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल आणि कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना घरी पाठवले जाऊ शकतं. दरम्यान, आपलं अपहरण झाल्याच्या भीतीमुळे महिलांना मोठा धक्का बसला आहे. अशात त्यांना या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्या मानसिकरित्या खचल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घरपोच मिळणार ‘ही’ सेवा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात