पुणे, 3 मे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा ब्रेक लागला आहे. मुंबईनंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने पुणे जिल्हा रेड झोनमध्ये टाकण्यात आला आहे. त्यामुळे येथील इतर उद्योग-व्यवसायांप्रमाणे शेतीवरही मोठा परिणाम झाला आहे. मात्र आता या भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे.
पुणे जिल्हा परिषदेने रेपोस एनर्जीच्या सेवेला मंजुरी दिल्यानंतर, कृषी क्षेत्राला इंधन पुरवण्यासाठी डोर-टू-डोर डिझेल वितरण सेवा प्रारंभ झाली आहे. कोविड 19 च्या प्रकोपानंतर कृषी अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी पुणे स्थित स्टार्टअप रेपॉस एनर्जी 1 मेपासून पुणे येथून ग्रामीण भारतात डिझेल पुरवेल.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी नुकत्याच जारी केलेल्या निर्देशानंतर कृषी क्षेत्रात डिझेल वाहतूक वाहनांद्वारे डोर-टू-डोर डिझेल वितरणाची परवानगी देण्यात आली आहे. डीजल वितरण सेवेचा प्रारंभ भोर आणि वेल्हा ह्या दोन तालुक्यात, रंजीत शिवतारे ( उपाध्यक्ष, पुणे ज़िल्हा परिषद), श्रीधर केंद्रे (चेयरमैन, पंचायत समिति भोर), विशाल तनपुरे (बी.डी.ओ, भोर), रेपोस एनर्जी चे राजेंद्र वाळुंज व पूजा वाळुंज, बायदाबाई किसान कंक (सरपंच, निगुड़घर), संदीप ख़टापे (सरपंच, वठार) ह्यांच्या उपस्थितीत झाला.
हेही वाचा - 'ग्रीन झोन'मध्ये कोरोनाचा शिरकाव, चंद्रपुरात आढळला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण
वाहने मोबाइल इंधन स्टेशन म्हणून काम करतात जी आगारातून डिझेल गोळा करतात आणि गरजू शेतकर्यांना थेट पुरवतात. अशा प्रकारे त्यांना इंधन स्थानकांकडे लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागणार नाही. कोविडच्या प्रकोपा नंतर संकटग्रस्त शेतीप्रधान अर्थव्यवस्थाला उंचावण्यासाठी, राज्य सरकार, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद मोठा पाठिंबा देत आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.