मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अखेर ठरलं! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं फायनल वेळापत्रक जाहीर

अखेर ठरलं! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं फायनल वेळापत्रक जाहीर

वाचा दहावीचं अख्खं वेळापत्रक...

वाचा दहावीचं अख्खं वेळापत्रक...

वाचा दहावीचं अख्खं वेळापत्रक...

    मुंबई, 26 फेब्रुवारी : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद करण्याचा निर्णय देण्यात आला आहे. त्यातच महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी या वेळापत्रकावर पालक, शिक्षण व विद्यार्थ्यांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. अखेर चर्चेनंतर नवीन वेळापत्रक ठरविण्यात आलं आहे, अशी माहिती शिक्षण बोर्डाकडून देण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान ठेवण्यात येणार आहे, तर दुसरीकडे 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होईल, असं सांगण्यात आलं आहे. या परीक्षांदरम्यान कोरोनाच्या नियमावलीचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात. हे ही वाचा-मोठी बातमी : ठाणे शहरात मनाई आदेश, कोणत्या गोष्टींवर असणार बंदी? जाणून घ्या गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहे. पुढील करिअर व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याच्यादृष्टीने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. असे असेल महासाथ कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे प्राधान्य देऊन परीक्षेदरम्यान कडक नियमावलींचं पालन करावे, अशी सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता ठाणे शहरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश 1 मार्च 2021 रोजी 12 वाजेपासून 15 मार्च 2021 रोजी 12 वाजेपर्यंत अंमलात राहील. या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Exam, HSC, Ssc board

    पुढील बातम्या