• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • कोण आहेत फ्लाईंग शीख? त्यांचे ब्रिटनमधील स्मारक अंतिम टप्प्यात; इतिहास वाचून रोमांचित व्हाल

कोण आहेत फ्लाईंग शीख? त्यांचे ब्रिटनमधील स्मारक अंतिम टप्प्यात; इतिहास वाचून रोमांचित व्हाल

दोन्ही जागतिक महायुध्दांमध्ये भारतीय सैनिकांचा सन्मान करण्याची परंपरा अखेरीस ब्रिटनकडून सुरू झाली. 20 शतकातील अशी एक शीख व्यक्ती की जे फायटर पायलट तर होतेच परंतु,उत्तम गोल्फ आणि क्रिकेटपटू होते.

  • Share this:
ब्रिटन, 10 मार्च : दोन्ही जागतिक महायुध्दांमध्ये (World War) ब्रिटनसाठी (Britain) आपल्या जिवाची पर्वा केली नाही. या भारतीय सैनिकांचा सन्मान करण्याची परंपरा अखेरीस ब्रिटनकडून सुरू झाली. 20 शतकातील अशी एक शीख व्यक्ती की जे फायटर पायलट (Fighter Pilot) तर होतेच परंतु उत्तम गोल्फ आणि क्रिकेटपटू होते. त्यांच्या स्मरणार्थ इंग्लंडमधील बंदर असलेल्या साउथॅम्प्टन या शहरात उभारण्यात येणाऱ्या नवीन स्मारकाच्या डिझाईनला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. त्यांचं नाव आहे हरदीतसिंग मलिक ज्यांना फ्लाईंग शीख म्हणूनही ओळखलं जातं. ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटीत (Oxford University) शिक्षणासाठी गेलेले आणि पहिल्या महायुध्दावेळी ब्रिटनच्या रॉयल फ्लाईंग कॉर्प्सचे सदस्य बनलेले हरदीतसिंग मलिक यांचे नाव संस्मरणीय आहे. ते पहिले भारतीय शीख लढाऊ पायलट होते. त्यांच्या पगडीच्या अनुषंगाने विशेष हेल्मेट देखील तयार करण्यात आले होते. स्मारकची उभारणी का होतेय? मलिक यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारत असलेल्या वन कम्युनिटी हॅंम्पशायर अॅण्ड डॉरसेटच्या म्हणण्यानुसार मलिक हे पहिल्या महायुध्दादरम्यान हिरो ठरले. मलिक यांच्या स्मारकाच्या निमित्ताने पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दात ब्रिटनसाठी योगदान देणाऱ्या सर्व शीख व्यक्तींचा सन्मान होईल. संपूर्ण शीख समुदायाच्या योगदानाचे प्रतीक म्हणूनही या स्मारकाला महत्व आहे. हरदीतसिंग मलिक कोण होते? त्यांचे स्मरण का केलं जातय जाणून घेऊया... मलिक यांनी किती भूमिका बजावल्या? 1917 ते 1919 दरम्यान फायटर पायलट म्हणून मलिक यांची ख्याती सर्वाधिक होती. जेव्हा जेव्हा त्यांचं स्मरण केलं जातं तेव्हा त्यांच्या या भूमिकेचा उल्लेख होतो. परंतु,या खेरीज मलिक यांनी अनेक महत्वपूर्ण कामगिरी केल्या होत्या. मलिक उत्तम खेळाडू होते वयाच्या 14 व्या वर्षी 1908 मध्ये इंग्लडला गेलेल्या मलिक यांनी 1915 मध्येऑक्सफर्ड युनिर्व्हसिटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. गोल्फ या खेळात त्यांनी ऑक्सफर्ड ब्लूसन्मान मिळवला होता. तसेच 1914 ते 1930 दरम्यान ते क्रिकेटपटू (Cricket Player) देखील होते. 1914 आणि 1921 मध्ये मलिक ससेक्सटिमसाठी तर 1923 ते 1930 दरम्यान भारतात लाहोर कप स्पर्धेसाठी हिंदू,शीखांसाठी क्रिकेट खेळले होते. मलिक एक उत्तम पायलट होते पहिल्या महायुध्दात चार भारतीयांनी पायलट म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती. त्यापैकी 2 जण बचावले होते. यात इतिहास निर्माण करणाऱ्या ईसी सेन आणि मलिक यांचा समावेश होता. महायुध्द संपेपर्यंत मलिक 6 वेळा विजयी ठरले होते. त्यामुळे त्यांना फ्लाईंग शीख (Flying Sikh) ही पदवी बहाल करण्यात आली. (हे पाहा: 'स्कुबा डायव्हिंगला निघालात का?' संसदेत गेलेल्या मराठी खासदाराला मास्कवरुन सवाल ) मलिक प्रशासकीय कर्मचारी होते 1921 मध्ये ब्रिटीश राजवटीत मलिक हे नागरी सेवा परीक्षा पास झाले. भारत स्वतंत्रहोईपर्यंत त्यांनी ब्रिटिश प्रशासनात सेवा केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मलिक यांची कॅनडात हाय कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते फ्रान्सचे राजदूत होते. फ्रान्स सरकारने त्यांचा लीजन ऑफ ऑनरने सन्मानित केलं. फ्रान्समधील हा नागरी व लष्करी दोन्ही क्षेत्रांतील सर्वोच्च सन्मान आहे. मलिक एक लेखक देखील होते मलिक यांचे जीवन अनुभव संपन्न होते. हे अनुभव कागदावर उतरवण्याची गरज होती. वयाच्या 91 व्या वर्षी 1985 मध्ये अखेरचा श्वास घेण्यापूर्वी काही वर्षे ते आत्मचरित्र लिहीत होते. 2011 मध्ये ते ए लिटील वर्क, लिटील प्ले म्हणून प्रकाशित झाले. इंडियन एअरफोर्सकडून त्यांना मानद रॅंक मिळाली होती. शेवटच्या श्वासापर्यंत ते सक्रिय होते.
First published: