मराठी बातम्या /बातम्या /देश /'काय, स्कुबा डायव्हिंगला निघालात का?' संसदेत गेलेल्या मराठी खासदाराला मास्कवरुन विचारला प्रश्न

'काय, स्कुबा डायव्हिंगला निघालात का?' संसदेत गेलेल्या मराठी खासदाराला मास्कवरुन विचारला प्रश्न

विशेष म्हणजे हा मास्क एका माजी खासदाराने डिजाइन केला आहे.

विशेष म्हणजे हा मास्क एका माजी खासदाराने डिजाइन केला आहे.

विशेष म्हणजे हा मास्क एका माजी खासदाराने डिजाइन केला आहे.

नवी दिल्‍ली, 8 मार्च : संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्रांचा दुसरा टप्पा सोमवारी सुरू झाला. राज्‍यसभेच्या कार्यवाहीत भाग घेण्यासाठी महाराष्ट्रातील डॉ. नरेंद्र जाधवदेखील आले होते. त्यांनी खूप चांगल्या दर्जेचा मास्क लावला होता. या मास्कमध्ये त्यांचे तोंड, नाकासह डोळेदेखील कव्हर झाले होते. हा हाय एफिशियन्सी पर्टिकुलेट एयर (HEPA) फिल्‍टर मास्‍क होता. हा मास्क माजी खासदार विश्वेश्वर रेड्डी यांनी डिजाइन केला आहे. सोशल मीडियावर जेव्हा HEPA मास्‍क लावलेल्या खासदारांचा फोटो पोहोचला, त्यानंतर त्यावर खूप चर्चा सुरू झाली. कोणी म्हणालं, आता स्पेश सूट घालणं शिल्लक राहिलं आहे तर कोणी म्हणालं की, खासदार बहुतेक स्कुबा डायव्हिंगला जात आहेत, संसदेत नाही.

लांबून पाहिलं तर स्कूबा डायव्हिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या मास्कप्रमाणे दिसत आहे. डॉ. जाधव यांनी न्यूज एजन्सी ANI शी बोलताना सांगितलं की, या मास्कची गुणवत्ता 99.7% आहे. याचा अर्थ अत्यंत लहान पार्टिकुलेट मॅटर शरीराच्या आता जातो. जाधव यांना 2016 मध्ये राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी नामांकित केलं होतं. काही युजर्स म्हणाले की, अशा प्रकारचे मास्क खूप महाग असतात. सर्वसामान्य जनता कधीच अशा प्रकारचे मास्क वापरू शकणार नाही. काहीजणांना अशा स्वरुपाचे मास्क हे स्पेस सूटचा एक भाग असल्याचं सांगितलं. तर काही म्हणाले की, लवकरच खासदार स्टार वॉर्सच्या पोशाखात दिसून येतील. एका युजरने स्पेस सूटचा फोटो शेअर करून सांगितलं की, 100 टक्के प्रोटेक्शनसाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

हे ही वाचा-राहुल गांधींना आली जुन्या मित्राची आठवण, ज्योतिरादित्य शिंदेंबद्दल म्हणाले...

कोरोनापासून बचाव की नाही?

खासदार नरेंद्र जाधव यांनी हा मास्क प्रदूषण आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी लावला आहे. काही जणं म्हणाले की, HEPA फिल्‍टर प्रदूषणातील तत्वांसाठी असतो. व्हायरससाठी नाही. तर एका युजरने सांगितलं की, वॉल्व मास्क कोरोना व्हायरसपासून बचाव करू शकत नाही. मात्र याचं डिजाइन करणारे रेड्डी म्हणाले की, हे पॉजिटिव्ह प्रेशन टर्बाइन पॉवर्ड मास्क आहे. रेड्डी सांगतात की, ते स्वत:देखील फ्लाइट्स आणि गर्दीच्या ठिकाणी या मास्कचा वापर करतात.

नरेंद्र जाधव हे भारतातील अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक व समाजशास्त्रज्ञ आहेत. अनेक विषयांवर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहे. त्यांनी हिंदी व इंग्रजीतही विपुल लिखाण केलं आहे. 

First published:

Tags: Coronavirus, Covid19, Delhi, India, Mask, Parliament, Social distancing