• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • वडिलांचं नाव सनी देओल, आई प्रियांका चोप्रा; 12 वीची उत्तरपत्रिका पाहून शिक्षक शॉक!

वडिलांचं नाव सनी देओल, आई प्रियांका चोप्रा; 12 वीची उत्तरपत्रिका पाहून शिक्षक शॉक!

कोरोनानंतर अनेक ठिकाणी शाळा, कॉलेज सुरू झाले आहेत. दोन वर्षांनंतर मुलं शाळा-कॉलेजात आली खरी, मात्र ही परिस्थिती भयंकर आहे.

 • Share this:
  बेतिया, 23 ऑक्टोबर : अनेकदा परीक्षेदरम्यान (Exam) काही मुलांची उत्तर पत्रिका ( Shocking Answer Sheet) पाहून कोणीही हैराण होईल. काही जणं तर उत्तरपत्रिकेत थेट गाणी लिहून येतात. त्याहून भयंकर प्रकार समोर आला आहे. राम लखन सिंह यादव कॉलेजमध्ये (Bihar News) सुरू असलेल्या 12 वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी विचित्र उत्तर लिहिल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या या उत्तर पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Fathers name is Sunny Deol mother is Priyanka Chopra Teacher shocked to see 12th standard answer sheet) एका विद्यार्थ्याने तर उत्तर पत्रिकेत आपल्या आईच्या नावाच्या जागी प्रियंका चोप्राचं नाव लिहिलं आहे. तर वडिलांचं नाव सनी देओल लिहिलं आहे. तर दुसऱ्या एका पठ्ठ्याने उत्तरपत्रिकेत प्रेमात 'बेवफा' झाल्याबद्दल लिहिलं आहे. राम लखन सिंह यादव महाविद्यालयाच्या उत्तर पत्रिकेवर अभिनेता, अभिनेत्रींची नावे पाहिल्यावर तर अनेकांना धक्काच बसला. त्यावर रोल नंबर नाही आणि प्रश्नांच्या उत्तरांच्या रखाण्यात काहीही विचित्र गोष्टी लिहिल्या आहेत. एका अन्य व्हायरल कॉपीमध्ये विद्यार्थ्याचं नाव आदित्य कुमार, रोल नं-170, वर्ग- 12 लिहिण्याबरोबरच एका तरुणीचं नाव लिहिण्याबरोबरच आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. हे ही वाचा-EXCLUSIVE: लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लशीबाबत अदार पुनावालांचं मोठं वक्तव्य व्हायरल होत असलेल्या उत्तर पत्रिकेत पुरातत्वबदद्ल प्रश्न विचारला होता, त्याखाली विद्यार्थ्यांनी लिहिलं की, आम्हाला शिक्षकांनी त्याबद्दल शिकवलं नाही. तर मोहनजोदडोच्या विशाल स्नानागारच्या वर्णनाबद्दल लिहिलं आहे की, राजाची पत्नी तेथे नाचत असे आणि कपडे चोरी करीत होत्या. कोरोनानंतर पुन्हा शाळा कॉलेज सुरू झाले आहेत. परीक्षेदरम्याम विद्यार्थ्यांना लांब बसवलं जात आहे. दरम्यान अशा प्रकारच्या उत्तर पत्रिकापाहून मुलांच्या भविष्याचा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे.

   
  Published by:Meenal Gangurde
  First published: