सासऱ्याने जावयाचं लावलं दुसरं लग्न; हनिमूनच्या पहिल्या रात्री तरुणाला बसला जबर धक्का

सासऱ्याने जावयाचं लावलं दुसरं लग्न; हनिमूनच्या पहिल्या रात्री तरुणाला बसला जबर धक्का

सासऱ्याने जावयाचं दुसरं लग्न तर लावलं मात्र तरुणाला याचा जबरदस्त फटका सहन करावा लागला.

  • Share this:

ग्वाल्हेर, 19 जानेवारी : कुटुंब न्यायालयात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील एका पोलिसाने आपलं लग्न रद्द करण्याची विनंती केली आहे. पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर पोलिसाने दुसरं लग्न केलं होतं, मात्र लग्नाच्या रात्री पत्नीबाबत धक्कादायक बातमी समोर आली. त्यामुळे पोलिसाने थेट कोर्टात धाव घेतली आणि लग्न रद्द करण्याची विनंती केली. पोलिसाचं दुसरं लग्न त्याच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांनी जमवून दिलं होतं. (On the first night of the honeymoon the young man was shocked) त्यांनीच जावयाला दुसऱ्या लग्नासाठी तयार केलं होतं. लवकरच या प्रकरणात कुटुंब न्यायालयात सुनावणी होणार आहे.

कोविड-19 मुळे मार्च 2020 मध्ये कुटुंब न्यायालयात सुनावणी होत नव्हत्या. मात्र नोव्हेंबर 2020 मध्ये काही ठराविक केसेसची सुनावणी सुरू झाली. गेल्या काही दिवसात कुटुंब न्यायालयात सुनावणीबरोबरच काऊन्सिंलींग देखील सुरू झालं आहे. कोर्ट सुरू झाल्यानंतर राकेश नावाच्या एक पोलिसानेही आपली केस दाखल केली. राकेशच्या पहिल्या पत्नीचं आजारातून निधन झालं होतं. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुलं आहेत. मुलांचं संगोपन करण्यासाठी राकेशला  (नाव बदललं आहे) दुसरं लग्न करायचं होतं, यातच त्याच्या पहिल्या पत्नीचे वडील एका मुलीचं स्थळ घेऊन आले होते.

हे ही वाचा-खासदारांना 50 रुपयांत चिकन करी नाही मिळणार! संसदेतील कॅन्टीनबाबत घेतला निर्णय

राकेशला सांगितलं की, तुझी दोन मुलं आहेत, आणि राणी (नाव बदललं आहे) आई होऊ शकत नाही. यासाठी ती मुलांचं चांगल्या प्रकारे संगोपन करेल. त्यामुळे राकेशही लग्नासाठी तयार झाला. सात महिन्यांपूर्वी राकेशचं लग्न झालं. लग्नाच्या रात्री त्याला एक धक्कादायक बाब कळली. (On the first night of the honeymoon the young man was shocked) राणी ही किन्नर असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने घरातल्यांना याबाबत सांगितलं, त्यानंतर सर्व नातेवाईक जमा झाले व त्यांनी हे लग्न रद्द करण्याचा अर्ज दाखल केला.

विवाह रद्द करण्याची तरतूद

हिंदू विवाह अधिनियम अनुच्छेद 11-12 मध्ये विवाह रद्द करण्याची तरतूद आहे. जर कोणा पुरुषाचं लग्न किन्नरसोबत लावलं गेलं तर विवाह रद्द होतो. यानंतर पतीच्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार राहत नाही. कारण हा विवाह धोका देऊन वा फसवणुकीने झालेला असतो. ज्यात कायद्याची मान्यता नसते.

Published by: Meenal Gangurde
First published: January 19, 2021, 9:41 PM IST
Tags: marriage

ताज्या बातम्या