Home /News /national /

खासदारांना आता 50 रुपयांत चिकन करी नाही मिळणार! संसदेतील कॅन्टीनबाबत मोदी सरकारने घेतला निर्णय

खासदारांना आता 50 रुपयांत चिकन करी नाही मिळणार! संसदेतील कॅन्टीनबाबत मोदी सरकारने घेतला निर्णय

संसदेत खासदारांना अवघ्या 12 रुपयात प्लेन डोसा मिळत होता, आता मात्र...

    नवी दिल्ली, 19 जानेवारी : लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आलं आहे. लोकसभा स्पीकर ओम बिरला यांनी मंगळवारी सांगितलं की, संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात 12 बैठका होतील, तर दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत असेल, ज्यात 21 बैठका होतील. ते पुढे म्हणाले की, आमचा प्रयत्न आहे की, सदन सर्वांच्या सहकार्याने चालेल. यावेळी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. संसदेच्या कॅन्टीनमध्ये खाण्याच्या पदार्थांवर मिळणारी सबसिडी पूर्णपणे रद्द करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. (MPs will no longer get chicken curry for Rs 50 ) लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी कॅन्टीनशी संबंधीत या आर्थिक बदलाबाबत अधिक माहिती दिली नाही. ते इतकंच म्हणाले की, खासदार आणि अन्य लोकांना मिळणारी सबसिडी पूर्णपणे रोखण्यात आली आहे.(MPs will no longer get chicken curry for Rs 50 ) त्याशिवाय लोकसभा बिजनेस एडव्हायजरी समितीतील सर्व पक्षांच्या सदस्यांनी एका मताने ही सबसिडी रद्द करण्यावर सहमती दर्शवली आहे. हे ही वाचा-..तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका! कंपनीने नागरिकांना केलं सूचित प्रत्येत वर्षी संसदेच्या कॅन्टीनला तब्बल 17 कोटी रुपयांची सबसिडी दिली जात होती. 2017-18 मध्ये एका आरटीआयमध्ये संसदेची रेट लिस्टही समोर आली होती. ज्यानुसार संसदेच्या कॅन्टीनमध्ये चिकन करी 50 रुपये आणि व्हेज थाळी 35 रुपयांमध्ये दिली जात आहे. त्याशिवाय थ्री कोर्स लंच तब्बल 106 रुपयांत आहे. इतकच नाही तर साऊथ इंडियन फूडमध्ये प्लेन डोसा अवघ्या 12 रुपया दिला जात आहे. लोकसभा अध्यक्षांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीबाबत सांगितलं की, उत्तर रेल्वेशिवाय आता आयटीडीसी संसदेचं कॅन्टीन चालवेल. ते पुढे म्हणाले की, संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व खासदारांना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं जाईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या