मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /बाप-लेकाचा विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू; आईच्या प्रसंगावधानाने दुसऱ्या मुलाचा जीव वाचला

बाप-लेकाचा विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू; आईच्या प्रसंगावधानाने दुसऱ्या मुलाचा जीव वाचला

बीड जिल्ह्यातील परळीतील (Parli Beed) बरकतनगरमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडील विहिरीत पाणी आणायला गेले होते. ते विहिरीत पडले आणि बुडाले. त्यांना वाचवताना त्यांचाच एक मुलगाही बुडाला. (Father and Son Drowned)

बीड जिल्ह्यातील परळीतील (Parli Beed) बरकतनगरमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडील विहिरीत पाणी आणायला गेले होते. ते विहिरीत पडले आणि बुडाले. त्यांना वाचवताना त्यांचाच एक मुलगाही बुडाला. (Father and Son Drowned)

बीड जिल्ह्यातील परळीतील (Parli Beed) बरकतनगरमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडील विहिरीत पाणी आणायला गेले होते. ते विहिरीत पडले आणि बुडाले. त्यांना वाचवताना त्यांचाच एक मुलगाही बुडाला. (Father and Son Drowned)

परळी, 14 मे : बीड जिल्ह्यातील परळी येथील (Parli Beed) बरकतनगरमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडील आणि मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वडील विहिरीवर पाणी आणायला गेले असता ते विहिरीत पडले आणि बुडाले. त्यावेळी तिथे उपस्थित मुलगाही त्यांनी वाचवताना बुडाला. (Father and Son Drowned) यानंतर दुसऱ्या मुलाने या दोघांना वाचवण्यासाठी उडी घेतली असताना तोही बुडत होता. यादरम्यान त्याच्या आईने दोरी फेकून वाचवले.

शेख सादिक शेख हमीद असे मृत वडिलांचे (वय 58) तर शेख रफिक शेख सादीक (वय 25) असे मुलाचे नाव आहे. ही घटना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

परळी शहराजवळील दादाहरी वडगाव शिवारातील शेख सादिक शेख हमीद (वय 58) विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले असता पाय घसरुन विहिरीत पडले. त्यांना काढण्यासाठी त्यांचा मुलगा शेख रफिक शेख सादीक (वय 25) याने विहिरीत उडी मारली. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघेही बुडाले. दोघांना वाचवण्यासाठी तिसरा मुलगा शेख साजिद शेख सादिक (वय 30) हा देखील विहिरीत उतरला. मात्र, तोही बुडत असल्याने आई शेख शौकत शेख सादिक हिने दोर टाकून हाताला धरून एका मुलाला वाचवले.

हेही वाचा - व्हिडिओ कॉलवर कोणासोबत बोलतीये? प्रश्न विचारताच भडकली पत्नी, पतीची केली भयानक अवस्था

घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अतिशय ह्रदयद्रावक ही घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेततळ्यात 2 सख्ख्या भावासह चिमुरड्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू 

सोलापूर येथे एका दुसऱ्या घटनेत शेततळ्याजवळ (farm pond) खेळत असताना दोन सख्या भावांसह एका मित्राचा पाण्यात बुडून (drowned ) दुर्दैवी मृत्यू झाला. सोलापुरातील जिल्ह्यातील शेटफळ इथं घडली आहे. ही तिन्ही चिमुरडी अवघ्या 7 ते 8 वर्षांची होती.  मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील शेततळ्यात ही घटना घडली आहे. शेततळ्यामध्ये 2 सख्ख्या भावांसोबत त्यांच्या लहान मित्राचाही मृत्यू झाला. शेततळ्याकडे गेलेल्या या तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 4 ते 5 वाजेच्या सुमारास घटना घडली. कार्तिक मुकेश हिंगमिरे (वय 7) आणि सिद्धेश्वर भरत निकम (वय 7 वर्ष), विनायक भरत निकम (8) अशी मृत मुलांची नाव आहे.  सिद्धेश्वर आणि विनायक हे दोघेही सख्खे भाऊ आहे.

First published:

Tags: Beed news, Death