मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /व्हिडिओ कॉलवर कोणासोबत बोलतीये? प्रश्न विचारताच भडकली पत्नी, पतीची केली भयानक अवस्था

व्हिडिओ कॉलवर कोणासोबत बोलतीये? प्रश्न विचारताच भडकली पत्नी, पतीची केली भयानक अवस्था

अकोला (Akola) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी व्हिडिओ कॉलवर (Wife on Video Call) कुणाशीतरी बोलत होती. पतीने यावेळी पत्नी कुणीशी बोलते विचारले असता तिने पतीसोबत वाद (Husband Wife Dispute) घातला.

अकोला, 14 मे : अकोला (Akola) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी व्हिडिओ कॉलवर (Wife on Video Call) कुणाशीतरी बोलत होती. पतीने यावेळी पत्नी कुणीशी बोलते विचारले असता तिने पतीसोबत वाद (Husband Wife Dispute) घातला. इतकेच नव्हे तर पतीवर चाकून वार केले आहेत. या प्रकारानंतर जखमी झालेल्या पतीने खदान पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. यानंतर याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं -

अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत पती-पत्नी आणि त्यांचा एक मुलगा, असे तिघेजण राहतात. 12 मे रोजी सकाळी साडेसात वाजता आपली पत्नी कुणाशीतरी व्हिडीओ कॉलवरून बोलताना पतीला दिसली. यावेळी कुणासोबत बोलत आहे, असे पतीने विचारले. त्यावर त्या दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात पत्नीने भाजी कापायचा चाकू मारण्यासाठी आणला असता पतीने घराबाहेर जाणे पसंत केले.

संध्याकाळी कामाहून परत आल्यानंतर आणि साडेनऊ वाजताच्या सुमारास तो झोपला होता. पतीने त्याला लाथ मारून उठवले आणि त्याच्याशी वाद घातला. यावेळी तिने पुन्हा सकाळी मारण्यासाठी आणलेला चाकू काढला. तिला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या मनगटावर, चेहऱ्यावर जखमा झाल्या. तसेच त्याच्या गळ्यावरही तिने चाकू लावल्याचा आरोप पतीने केला आहे.

हेही वाचा - मोबाईलच्या वादातून मित्रासोबत धक्कादायक कृत्य; आरोपी आणि मृत मुलगाही अल्पवयीन

त्यानंतर तिने 498च्या खोट्या गुन्ह्यात पतीसह नातेवाईकांना अडकवण्याची धमकी दिली. अखेर जखमी अवस्थेत पतीने खदान पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून नंतर पत्नीविरुद्ध भादंविचे कलम 324, 504, 506नुसार गुन्हा दाखल केला आहे.

First published:
top videos

    Tags: Akola News, Crime news, Wife and husband