नेहाल भुरे, (भंडारा) 31 मार्च : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर मिळाली आहे. खरिपाच्या हंगामात एनइएमएल पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस रूपाने मिळणाऱ्या प्रोत्साहन रकमेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. एवढेच नाही तर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा करणेही गुरुवारपासून सुरू झाले आहे.
खरीप पणन हंगाम 2022-23 मधील धान खरेदीसाठी नोंदणीकृत असलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून भंडारा जिल्ह्यासाठी मंजूर झालेली 198 कोटी 15 लाख रुपयांची भंडारा जिल्हा पणन कार्यालयाकडे सकाळीच प्राप्त झाली आहे. ही रक्कम प्राप्त होताच जिल्हा पणन कार्यालयाने गुरुवारी सकाळपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन रक्कम जमा करणे सुरू केले आहे.
चारा आणण्यासाठी जंगलात गेला पण घरी मृतदेह आला; नागपुरात तरुणासोबत धक्कादायक घटना
सायंकाळी 4 वाजेपर्यंत 51 कोटी रुपयांचे वाटपही झाले आहे. दरम्यान येत्या 5 दिवसात संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याची कमाल
लहरी निसर्ग, कमी होत चालेली सुपीक जमीन आणि शेतमालाच्या भावातील होणारे चढ-उतार यामुळे शेती करणे हे अधिक आव्हानात्मक बनलंय. बदलत्या काळात अधिक कल्पतेनं नव्या उत्पादनांची लागवड केली तर शेतीमध्ये यशस्वी होता येतं. त्यामुळे शेतकरी नवीन प्रयोग करत असतात.वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यानं चक्क काळा गहू पिकवलाय. या प्रकारची लागवड करणारा तो संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव शेतकरी आहे.
मृतदेहाशिवाय अंत्यसंस्कार, गावातून दररोज संध्याकाळी निघायची अंत्यसंस्कार, समोर आलं भयानक सत्य
राजेश डफर असं या प्रयोगशील शेतकऱ्याचं नाव आहे. ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातल्या जळगाव या गावाचे रहिवाशी आहेत. डफर यांनी पहिल्यांदाच काळ्या गव्हाची लागवड केलीय. 'सामान्य गव्हाच्या पेरणी प्रमाणेच काळ्या गव्हाची लागवड केली जाते. 40 किलो बियाण्यांची एक एकरमध्ये पेरणी केली. आश्चर्य म्हणजे एक एकरात तब्बल 18 क्विंटल काळ्या गव्हाचं उत्पादन झालं, ' अशी माहिती राजेश यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhandara Gondiya, Local18