जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पत्नी आणि मुलांना विष देऊन मंत्रालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

पत्नी आणि मुलांना विष देऊन मंत्रालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

पत्नी आणि मुलांना विष देऊन मंत्रालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याने आपल्या पत्नी आणि मुलांना विष देऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 23 जून : मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याने आपल्या पत्नी आणि मुलांना विष देऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.  राजेश भिंगारे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. राजेश भिंगारे हे बांद्र्यातील शासकीय वसाहतीत राहात होते. आज दुपारच्या सुमारास घरातील कुणीही दरवाजा न उघडल्यानं शेजाऱ्यानं पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर हा प्रकार पुढे आला. राजेश यांनी शितपेयातून कुटुंबाला विष दिलं त्यानंतर स्वत: विषप्राषन केलं. मृतांमध्ये राजेश भिंगारे, त्यांच्या पत्नी अश्विनी, मोठा मुलगा तुषार, आणि लहान मुलगा गौरांग यांचा समावेश आहे. पुण्यात प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, धडापासून शीर केलं वेगळं राजेश विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. राजेशने इतकं टोकाच पाऊल का उचलं याचा पोलीस तपास करत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात