जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / अनिल परब यांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांना ED ची नोटीस, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

अनिल परब यांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांना ED ची नोटीस, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 सप्टेंबर: शिवसेनेचे नेते (Shivsena Leader) आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग खरमाटे (Bajrang Kharmate) यांना ईडीनं (Enforcement Directorate) नोटीस बजावली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं मनी लाँडरिंग प्रकरणी (Money Laundering Case) ही नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. बजरंग खरमाटे हे अनिल परब यांचे विश्वासू मानले जातात. खरमाटे हे आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) अधिकारी आहे. त्यांना आज चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. ईडीकडून खरमाटे यांना बजावलेलं हे पहिलं समन्स आहे. गेल्या आठवड्यात अनिल परब यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ईडीनं बजावली होती. आता खरमाटे यांना आलेल्या नोटीशीमुळे परब यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे.

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात 30 ऑगस्ट रोजी खरमाटे यांच्या नागपूर येथील घरावर ईडीनं छापेमारी केली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. या छापेमारी दरम्यान ईडीनं काही कागदपत्रंही ताब्यात घेतली आहे. बेळगाव महापालिकेवर कोणाचा झेंडा? थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात अनिल परब चौकशीसाठी गैरहजर याआधी ईडीनं अनिल परब यांना नोटीस बजावली होती. नोटीस दिल्यानंतर त्यांना 31 ऑगस्टला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र चौकशीसाठी अनिल परब उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी ईडीला कळवलं की, मंत्रीपदाची जबाबदारी असल्यानं काही कामं आधीच ठरवण्यात आली आहेत. त्यामुळे चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात