मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Spacex ने रचला इतिहास, कंपनीने 4 सर्वसामान्यांना पाठवलं अंतराळात

Spacex ने रचला इतिहास, कंपनीने 4 सर्वसामान्यांना पाठवलं अंतराळात

SpaceX ने बुधवारी रात्री इंस्पिरेशन 4 मिशनला जगातील पहिल्या ऑल सिव्हिलियन क्रूसह अंतराळात लाँच करुन इतिहास रचला आहे. पहिल्यांदा 4 सर्वसामान्यांना अंतराळात पाठवलं आहे.

SpaceX ने बुधवारी रात्री इंस्पिरेशन 4 मिशनला जगातील पहिल्या ऑल सिव्हिलियन क्रूसह अंतराळात लाँच करुन इतिहास रचला आहे. पहिल्यांदा 4 सर्वसामान्यांना अंतराळात पाठवलं आहे.

SpaceX ने बुधवारी रात्री इंस्पिरेशन 4 मिशनला जगातील पहिल्या ऑल सिव्हिलियन क्रूसह अंतराळात लाँच करुन इतिहास रचला आहे. पहिल्यांदा 4 सर्वसामान्यांना अंतराळात पाठवलं आहे.

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : एलॉन मस्क (Elon Musk) यांची अमेरिकी एयरोस्पेस कंपनी स्पेसएक्सने (SpaceX) बुधवारी रात्री इंस्पिरेशन 4 मिशनला जगातील पहिल्या ऑल सिव्हिलियन क्रूसह अंतराळात लाँच करुन इतिहास रचला आहे. कंपनीने भारतीय वेळेनुसार, सकाळी 5 वाजून 32 मिनिटांनी पहिल्यांदा 4 सर्वसामान्यांना अंतराळात पाठवलं आहे. हे चार लोक 3 दिवसापर्यंत 575 किमीवर पृथ्वीच्या कक्षेत राहतील.

हे चार लोक पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 575 किलोमीटर उंचीवर प्रवास करत आहेत. नासाचे (Nasa) फ्लोरिडामध्ये असलेल्या कॅनेडी स्पेस रिसर्च सेंटरपासून रॉकेटचं लाँचिंग केलं गेलं. ही घटना अंतराळ यात्रेबाबत आवड असणाऱ्या लोकांमध्ये कुतूहल ठरत आहे. या मिशनमध्ये केवळ सरकार पुरस्कृत अंतराळवीरांपेक्षा सामान्य लोकांसाठी मानवी अंतराळ उड्डाणाच्या नवीन युगाची सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे.

2009 मध्ये शास्त्रज्ञांनी 541 किमी उंचीवर जाऊन हबल टेलिस्कोपची दुरुस्ती केली होती. यावर्षी 2009 नंतर पहिल्यांदा माणूस इतक्या उंचीवर आहे. स्पेसएक्सचं ड्रॅगन कॅप्सूल लिस्टऑफच्या 12 मिनिटांनंतर फाल्कन 9 रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्यापासून वेगळं झालं. त्यानंतर एयरोस्पेस कंपनीने, नागरी क्रू यशस्वीरित्या कक्षेत लाँच करण्यात आल्याचं सांगितलं. या मिशनला 38 वर्षीय अब्जाधिश जेरेड इसाकमॅन यांनी फंड दिला आहे. ते शिफ्ट 4 पेमेंट्स इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते स्पेसफ्लाइटचे मिशन कमांडरही आहेत, ज्यांनी स्पर्धेद्वारे क्रूची निवड केली.

दरम्यान, याआधी टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या स्पेसएक्स या कंपनीने अंतराळात पाठवलेलं स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सुल (SpaceX Crew Dragon capsule) या अंतराळ यानाचं पृथ्वीवर यशस्वी लॅण्डिंग झालं होतं. चार अंतराळवीरांना घेऊन रविवारी रात्री पनामा शहराजवळील मेक्सिको खाडीत पहाटे तीन वाजताच्या दरम्यान हे यान उतरलं. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या सहकार्याने ही अंतराळ मोहीम राबवण्यात आली होती. गेल्या 50 वर्षांत पहिल्यांदाच नासाचं कुठलंही अवकाश यान रात्रीच्या वेळी समुद्रात लॅण्ड झालं. त्यामुळेही हा क्षण महत्त्वाचा होता.

First published:
top videos

    Tags: Elon musk, Space-x