चहा आणि सुका मेवा : चहामध्ये दूध असते आणि दुधासोबत लोह असलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे. सुक्का मेवा म्हणजेच ड्राय फ्रूट्समध्ये (Dry Fruits) भरपूर लोह असते. त्यामुळे चहासोबत ते खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
चहा आणि लोहयुक्त भाज्या : लोहयुक्त पदार्थ चहासोबत खाऊ नयेत. कारण चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट असतात. जे लोहयुक्त पदार्थ (Iron Rich Vegetable) शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करतात. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या, तृणधान्ये, कडधान्ये असे लोहयुक्त पदार्थ चहासोबत खाणे टाळावेत.
चहा आणि लिंबू : अनेक जण लिंबू घातलेला चहा (Lemon Tea) पिण्याचा सल्ला देतात. कारण काही लोकांना वाटते की यामुळे वजन कमी होते. परंतु असा चहा आपल्यासाठी हानीकारकदेखील ठरू शकतो. चहामध्ये लिंबाचा रस मिसळल्याने ते अॅसिडिक बनते आणि यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू चहा प्यायल्यास अॅसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ या समस्यादेखील उद्भवतात.
चहा आणि बेसन : चहासोबत अनेक जणांना भाजी किंवा सामोसे खाण्याची सवय असते. मात्र तज्ज्ञांचे मत आहे की, चहासोबत बेसनाचे पदार्थ खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात आणि शरीराची पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमताही कमी होते. त्यामुळे बेसनापासून बनवलेले पदार्थ चहासोबत कधीही खाऊ नका.
चहा आणि हळद : अजतकने दिलेल्या माहितीनुसार, चहा पिताना हळद (Tea And Turmeric) असलेले पदार्थ टाळावेत. कारण त्यामुळे पोटात गॅस, अॅसिडीटी किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्याही होऊ शकतात.
चहा आणि थंड पदार्थ : गरम चहासोबत किंवा चहानंतर लगेच थंड पदार्थ (Hot Tea And Cold Food) कधीही खाऊ नका. असे केल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात. कारण वेगवेगळ्या तापमानाचे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया कमकुवत होऊन मळमळ होऊ शकते. गरम चहा प्यायल्यानंतर किमान 30 मिनिटे थंड काहीही खाणे टाळा.