दिपक बोरसे/धुळे, 4 जुलै : समृद्धी महामार्गावरील बुलढाणा येथे झालेल्या अपघातापासून लोक सावरत असताना मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळील अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. बुलढाणा अपघातात 25 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. या अपघाताचा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणं जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेक फेल झाल्याने कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरला. या दुर्घटनेत 9 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला तर तर पंधरा ते वीस जणं जखमी झाले आहेत. मृत्यू पडलेल्यांची संख्या अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातस्थळी मोठ्या संख्येत जमाव एकत्र आला आहे.
बुलढाण्यानंतर आणखी एक भीषण अपघात, 2 गाड्यांना फरफटत नेलं आणि थेट हॉटेलमध्ये घुसला कंटेनर, ९ जणांचा जागीच मृत्यू #roadaccident #marathinews #News18lokmat pic.twitter.com/TyzQbnsZ4y
— News18Lokmat (@News18lokmat) July 4, 2023
हा अपघात इतका भीषण होता की, 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह रस्त्यावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. बातमी अपडेट होत आहे.