जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / नवस फेडण्याआधीच 6 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू; देवीच्या दर्शनाला जाताना अघटित घडलं

नवस फेडण्याआधीच 6 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू; देवीच्या दर्शनाला जाताना अघटित घडलं

नवस फेडण्याआधीच 6 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू; देवीच्या दर्शनाला जाताना अघटित घडलं

बऱ्याच वर्षांनी घरात पाळणा हलला होता, देवीला केलेला नवस फेडण्यासाठी अख्खं कुटुंब सकाळीच दर्शनासाठी निघाले होते, मात्र…

  • -MIN READ
  • Last Updated :

इंदूर, 1 जुलै: इंदूरमध्ये (Indore) एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्ते अपघातात (Road Accident) एका 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब आनंदोत्सव साजरा करीत होतं. कुटुंबाने तिच्या जन्मासाठी देवाकडे नवसही मागितला होता. तो पूर्ण करण्यासाठी कुटुंबीय बिजासेन देवीच्या मंदिरात जात होते. त्यादरम्यान रस्त्यात एका लोडिंग ऑटोने त्यांचा आनंद हिरावून घेतला. (death of a 6 month old daughter in road accident)

या अपघातामुळे धार येथील जैन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण कुटुंब इंदूरमध्ये बिजासेन देवीच्या मंदिरात दर्शन करण्यात जात होते. मात्र रस्त्यात एका लोडिंग वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. हा अपघात इतका जबरदस्त होता की, मांडीवर बसलेल्या सहा महिन्याच्या कनिष्ठाचा जागीच मृत्यू झाला. त्याशिवाय अन्य सदस्य जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 5 वर्षांनंतर झाला होता मुलीचा जन्म धार जिल्ह्यात राहणारे मनीष जैन आणि पत्नी इंदूर येथे येत होते. मनीष जैनने आपल्या मुलीच्या जन्मासाठी नवस मागितला होता. मुलगी सहा महिन्यांची झाली होती. त्यामुळे जैन कुटुंब मनीषला घेऊन देवीच्या मंदिरात नवस फेडण्यासाठी निघाली होती. धार येथून मनीष जैन यांचं कुटुंब सकाळी साधारण चार वाजता निघाले होते. धार येथून इंदूरला ते व्यवस्थित पोहोचले. ते दिलीप नगर या भागात काही कामासाठी थांबले होते. कार रस्त्याच्या कडेला उभी होती. यादरम्यान समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाचं नियंत्रण सुटलं व ती गाडी गाडीवर वर चढली. कारमध्ये मनीष जैन यांची सहा महिन्यांची मुलगी, पत्नी, ड्रायव्हर आणि अन्य नातेवाईक बसले होते. ही धडक इतकी भीषण होती की, गाडीत बसलेल्या सहा महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. हे ही वाचा- शेतात सापडले 5 मानवी सांगाडे, प्रेमप्रकरणातून हत्याकांड झाल्याचं उघड

लोडिंग वाहनाच्या ड्रायव्हरचा शोध सुरू घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचली. लहानचा मृतदेह पोस्टमार्टसाठी पाठविण्यात आला व जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आलं. आरोपी वाहन चालक घटनेनंतर फरार झाला असून पोलीस आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजचा तपास करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात