चक्रीवादळाचे बळी; राज्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, पुढील काही तास धोक्याचे!

चक्रीवादळाचे बळी; राज्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, पुढील काही तास धोक्याचे!

राज्यात तौत्के चक्रीवादळामुळे हाहाकार माजला आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे लोकांचं मोठं नुकसान झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 17 मे: राज्यात तौत्के चक्रीवादळामुळे हाहाकार माजला आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रातील तौत्के चक्रीवादळामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात 3 तर जळगावात दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आली आहे. अद्याप मुंबईतून जीवितहानी झाल्याची बातमी नाही.

पुढच्या काही तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडेल, असं IMD ने सांगितलं आहे. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी कमाल ताशी 120 किमी पर्यंत पोहोचण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकर, ठाणेकरांनी सावध राहावं. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भेंडखोल येथे समुद्र उधणलेला आणि जोरदार वारे वाहत आहेत. याशिवाय रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पेक्षाही भयानक स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे रायगडवासी चिंतेत असून मागच्या निसर्ग वादळाच्या आठवणी अजूनही ताज्या असताना या चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे.

हे ही वाचा-मुंबईत पावसाचा जोर वाढला; मरीन ड्राईव्हवर समुद्राचं रौद्र रुप; पाहा VIDEO

चक्रीवादळाच्या परिणामामुळे मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. समुद्रालगत असलेल्या पश्चिम उपनगरांना पाऊस आणि वाऱ्याने अक्षरशः झोडपून काढलं आहे, पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी 3 तासात शंभर मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 17, 2021, 5:04 PM IST

ताज्या बातम्या