जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / जिऱ्याला 70,000 रुपये क्विंटलचा भाव? अचानक झालेल्या या दरवाढीमागे काय आहे कारण?

जिऱ्याला 70,000 रुपये क्विंटलचा भाव? अचानक झालेल्या या दरवाढीमागे काय आहे कारण?

जिऱ्याला 70,000 रुपये क्विंटलचा भाव? अचानक झालेल्या या दरवाढीमागे काय आहे कारण?

गेल्या तीन महिन्यांतील जिऱ्याच्या किमतीवर नजर टाकल्यास मार्चमध्ये 280 रुपये प्रति किलो, एप्रिलमध्ये 350 रुपये प्रति किलो, मे महिन्यात 500 रुपये प्रति किलो, जूनमध्ये 700 रुपये प्रति किलो दर झाला आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 28 जून : टोमॅटोप्रमाणेच जिऱ्याचे वाढते दर सामान्य नागरिकांची चिंता वाढवत आहेत. ग्राहकांसाठी महाग होणारं जिरं शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरतंय. एक तोळे सोन्यापेक्षा एक क्विंटल जिऱ्याचे भाव जास्त आहेत. जिरं 70 हजार रुपये क्विंटल झालंय. जिऱ्याच्या दरवाढीची कारणं, चीन व बांगलादेश कनेक्शन व शेतकऱ्यांना होणारा फायदा, याबद्दल जाणून घेऊयात. ‘एनडीटीव्ही’ने या संदर्भात वृत्त दिलंय. खारी बावली हा दिल्लीतील बाजार मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जिऱ्याचे वाढते दर पाहून ग्राहकच नव्हे तर जिऱ्याचे व्यापारीही आश्चर्य व्यक्त करत आहेत. गेल्या तीन महिन्यांतील जिऱ्याच्या किमतीवर नजर टाकल्यास मार्चमध्ये 280 रुपये प्रति किलो, एप्रिलमध्ये 350 रुपये प्रति किलो, मे महिन्यात 500 रुपये प्रति किलो, जूनमध्ये 700 रुपये प्रति किलो दर झाला आहे. खारी बावलीतील जिऱ्याचे व्यापारी रवी कुमार म्हणाले, “जिऱ्याच्या किमती या पूर्वी कधीही इतक्या वाढल्या नव्हत्या. या वेळी 40 लाख पोती जिऱ्याचं उत्पादन झालं आहे. आतापर्यंत 25 लाख पोत्यांची विक्री झाली आहे. मागणी जास्त आहे, तर पुरवठा कमी आहे. यामुळेच दिवाळीपर्यंत जिऱ्याचा भाव 800 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचेल.” जिरं शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरतंय का? राजस्थानच्या जोधपूर मंडईत भोपाळगडचे शेतकरी मोहन राम भेटले. त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. गेल्या वर्षी 10 बिघ्यांमध्ये 20 पोती जिऱ्याचं उत्पादन झालं होतं. मात्र यंदा अतिउष्णतेमुळे जिऱ्याचं उत्पादन कमी होऊनही ते खूश आहेत. ‘एनडीटीव्ही’शी बोलताना मोहन राम म्हणाले, “गेल्या वर्षी 10 बिघ्यांत 20 ते 22 पोती जिऱ्याचं उत्पादन झालं होतं. यंदा फक्त सात ते आठ पोती जिऱ्याचं उत्पादन झालं. गेल्या वर्षी एका पोत्याचं 20 ते 25 हजार रुपये मिळाले होते, पण यंदा 50 ते 60 हजार मिळत आहेत. Weather Update : मुंबई, पुण्यासह राज्याच्या या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा राजस्थान व गुजरातचं जिरं सर्वांत चांगलं राजस्थान आणि गुजरातचं जिरं संपूर्ण जगात सर्वोत्तम मानलं जातं. त्यामुळे चीन आणि बांगलादेश हे त्याचे मोठे खरेदीदार आहेत, मात्र यंदा बदलत्या हवामानामुळे जिऱ्याचं उत्पादन कमी झालं आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम केवळ जिऱ्यावरच नाही, तर अनेक पिकांवर होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. एक्सपर्ट काय म्हणतात? कृषी एक्सपर्ट देवेंद्र शर्मा म्हणाले, “केवळ जिरंच नाही, तर अनेक पिकांना ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसला आहे. तुम्हाला आठवत असेल की अतिउष्णतेमुळे गव्हाचं उत्पादन घटलं होतं व सरकारला निर्यात थांबवावी लागली होती.” काय म्हणतात जिरे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष? जिरे व्यापारी मंडळ जोधपूरचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुंदडा म्हणाले, “गेल्या वर्षी 80-90 लाख पोत्यांचं उत्पादन झालं होतं. तेव्हा जिऱ्याची आवक 20 ते 25 हजार क्विंटल होती. या वेळी उष्णतेमुळे जिऱ्याचं उत्पादन 50 लाख पोत्यांपर्यंत कमी झालं आहे.”

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: cum , farm , farmer
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात