मुंबई, 19 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पण राज्यात काही ठिकाणी 20 एप्रिलपासून नियम शिथिल करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा आणि इतर महत्त्वाच्या कामांना परवाणगी दिली असली तरी सास्कृतीक कार्यक्रम आणि रेल्वे व विमान सेवा या पूर्णपणे बंद असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवले. 20 तारखेपासून काही प्रमाणात परवानगी मिळेल. काही जिल्हे कोरोनामुक्त आहेत. काही ठिकाणी कोरोना रुग्णांमध्ये घट होत आहे. आपण झोन केलेले आहेत. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन केले आहेत. ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांतील उद्योगांना परवानगी देणार,’ अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमकी काय माहिती दिली पाहुयात… उद्धव ठाकरेंच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे - आपण आतापर्यंत कोरोनाच्या 66 हजारांहून अधिक टेस्ट केल्या आहेत. त्यातील 95 टक्के लोक निगेटिव्ह निघाले - कोरोना प्रादुर्भाव झालेल्या 350 हून अधिक जणांना बरं केलं - सध्या 52 रुग्ण गंभीर कॅटगरीत मोडणारे आहेत - काहीवेळा शेवटच्या टप्प्यात रुग्ण डॉक्टरकडे पोहोचतो - सर्दी-खोकला-ताप हे लक्षण दिसल्यास लपवू नका - आपण क्युअर क्लिनिक सुरू केले आहेत भाजी विकणाराच निघाला COVID-19 पॉझिटिव्ह, 2000 लोकांना केलं होम क्वारंटाईन - कोरोना झाला तरी संपलं, असं नाही - आपले डॉक्टर कुठेही लढायला कमी नाहीत. पण काही प्रमाणात उपकरणांचा पुरवठा होत आहे - 80 टक्के लोकांपर्यंत राशन पोहोचवलं आहे. यामध्ये केंद्रही आपल्याला मदत करत आहे. - केंद्र सरकार मोफत धान्य देत आहे. पण त्यात फक्त तांदूळ आहे - आकडे कमी होत असले तरीही आपण भ्रमात राहायला नको. - नियम शिथिल केले असले तरी सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद राहणार. कोणीही इतर जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांत प्रवास करणार नाही - सर्व विमान सेवा आणि रेल्वे सेवा किमान 3 मेपर्यंत बंद राहणार - पुणे आणि मुंबईसारख्या रेड झोनमध्ये येण्यासाठी कोणालाही परवाणगी नाही - कोणत्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवाणगी नाही
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.