मुंबई, 22 सप्टेंबर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांच्या टीमची नवीन जर्सी आणि किट लॉन्च केलं आहे. ही जर्सी पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकजण पाकिस्तानच्या टीमच्या या नव्या जर्सीची खिल्ली उडवत आहेत. यामध्ये पाकिस्तानचा माजी खेळाडू लेगस्पिनर दानिश कनेरियानंही या जर्सीची खिल्ली उडवली आहे. त्याने तर नवीन जर्सीची तुलना टरबूज आणि फळांच्या दुकानाशी केली आहे.
पीसीबीने टी-20 वर्ल्ड कपसाठी दोन नवीन जर्सी लाँच केल्या आहेत. दोघांची डिझाईन्ससारखी असली तरी रंग वेगळे आहेत. या जर्सीच्या डिझाईनवरून मात्र दानिश कनेरियाने पीसीबीला जोरदार ट्रोल केलं. कनेरियाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला असून, त्यात म्हटलंय की, 'जर्सी गडद हिरव्या रंगाची असायला हवी होती. ही जर्सी टरबुजासारखी दिसते. ‘फ्रुट निन्जा’ नावाचा एक गेम आहे, ज्यामध्ये टरबूज कापून टाकायचं असतं. हा तोच रंग आहे. पीसीबीने जर्सीसाठी गडद हिरवा रंग वापरायला हवा होता. हे जर्सी घातल्यानंतर खेळाडू फळांच्या दुकानात उभे असल्यासारखं दिसेल.’
View this post on Instagram
41 वर्षीय दानिश कनेरियाने भारतीय टीमच्या जर्सीवरसुद्धा भाष्य केलंय. टीम इंडियाच्या जर्सीचा रंग गडद निळा असायला हवा, असं कनेरियाने म्हटलं आहे. गडद निळा रंग ताकदीची अनुभूती देतो, असं कनेरियाचं मत आहे. कनेरियाने पाकिस्तानसाठी 61 टेस्ट आणि 18 वन-डे मॅच खेळल्या आहेत. त्याने टेस्टमध्ये 261 आणि वन-डेमध्ये 15 विकेट घेतल्या आहेत.
Ind vs Aus : रोहित शर्मानं सांगितला मॅचचा टर्निंग पॉईंट, पराभवाबद्दल म्हणाला...
23 ऑक्टोबरला महामुकाबला
16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. पाकिस्तान टीमची पहिली मॅच 23 ऑक्टोबरला भारताविरुद्ध होणार आहे. हा महामुकाबला पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये आतापासूनच उत्सुकता आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसांत टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची सध्या सर्व टीम जोरदार तयारी करत आहेत. नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय टीमसाठी नवीन जर्सी लाँच केली. ही जर्सी पाहून सर्व भारतीय चाहते चांगलेच खूश झाले. अनेकांनी जर्सीचं कौतुक करत भारतीय टीमला वर्ल्ड कपसाठी शुभेच्छा दिल्या. भारतानंतर आता पीसीबीने देखील त्यांची जर्सी लाँच केली. मात्र, या जर्सीची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली जात असून, त्यामध्ये पाकिस्तानच्या माजी खेळाडूंचासुद्धा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Babar azam, Pakistan