मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Vijay Hazare Trophy : पृथ्वीने पुन्हा ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा, झळकावलं चौथं शतक

Vijay Hazare Trophy : पृथ्वीने पुन्हा ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा, झळकावलं चौथं शतक

टीम इंडियातून खराब फॉर्ममुळे वगळण्यात आलेला मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.कर्नाटक विरुद्ध सुरु असलेल्या सेमी फायनलमध्ये (Mumbai vs Karnataka) पृथ्वी शॉ ने शतक झळकावले आहे.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 11 मार्च : टीम इंडियातून खराब फॉर्ममुळे वगळण्यात आलेला मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत (Vijay Hazare Trophy 2021) प्रतिस्पर्धी टीमना पृथ्वीच्या बॅटचा तडाखा बसत आहे.  कर्नाटक विरुद्ध सुरु असलेल्या सेमी फायनलमध्ये (Mumbai vs Karnataka) पृथ्वी शॉ ने 122 बॉलमध्ये 165 रनची खेळी केली. पृथ्वीचे या स्पर्धेतील चौथे शतक असून त्यापैकी पुदुच्चेरी विरुद्ध त्याने द्विशतक झळकाले होते.

श्रेयस अय्यर (Shreya Iyer) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये पृथ्वी मुंबईचं नेतृत्व करत आहे. या स्पर्धेत फॉर्मात असलेल्या कर्नाटकविरुद्ध  मुंबईला पहिल्यांदा बॅटींगचे निमंत्रण मिळाले. पृथ्वीने  आक्रमक खेळ करत कर्नाटकच्या बॉलर्सवर वर्चस्व गाजवले.

पृथ्वीने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 48 बॉल घेतले. त्यानंतर पुढील 50 रनचा टप्पा त्याने फक्त 31 बॉलमध्ये पूर्ण केला. पृथ्वीने स्पर्धेतील चौथे शतक 79 बॉलमध्ये पूर्ण केले. 12 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं पृथ्वीने हे शतक पूर्ण केले. पृथ्वीने या मॅचमध्ये स्पर्धेतील 700 रनचा टप्पाही पूर्ण केला आहे. पृथ्वी शॉ ने हा टप्पा फक्त सातव्या मॅचमध्ये पूर्ण केला आहे. शतकानंतरही पृथ्वीचा आक्रमक खेळ कायम होता. त्याने पाहता-पाहता 150 चा टप्पा देखील ओलांडला. अखेर तो 165 रनवर

पृथ्वी शॉ याने याआधी पुदुच्चेरीविरुद्धच्या मॅचमध्ये द्विशतक तर दिल्ली आणि सौराष्ट्राविरुद्ध शतक केलं होतं. यंदाच्या मोसमात विजय हजारे ट्रॉफीच्या सलग 6 मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे.ग्रुप स्टेजमध्ये मुंबईने दिल्लीचा 7 विकेटने, महाराष्ट्राचा 6 विकेटने, पुदुच्चेरीचा 233 रननी, राजस्थानचा 67 रननी आणि हिमाचल प्रदेशचा 9 विकेटने पराभव केला होता. त्यानंतर सौराष्ट्राविरुद्ध 9 विकेट्स विजय मिळवत मुंबईने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता.

( वाचा : IPL 2021 : विराटच्या RCB मध्ये नवा गडी, स्ट्राईक रेट 180, मारतो मोठे सिक्स )

टीम इंडियातील जागेची दावेदारी

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील वन-डे टीममधील जागेसाठी पृथ्वी शॉने दावेदारी सादर केली आहे. त्याचबरोबर पुढच्या महिन्यात होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी देखील पृथ्वीचा फॉर्म दिल्ली कॅपिटल्ससाठी उपयुक्त ठरणार आहे.

First published:

Tags: Cricket, Mumbai, Prithvi Shaw, Vijay hazare trophy