मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : विराटच्या RCB मध्ये नवा गडी, स्ट्राईक रेट 180, मारतो मोठे सिक्स

IPL 2021 : विराटच्या RCB मध्ये नवा गडी, स्ट्राईक रेट 180, मारतो मोठे सिक्स

आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू होण्याआधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) त्यांच्या टीममध्ये नव्या खेळाडूला सामील करून घेतलं आहे. न्यूझीलंडचा आक्रमक खेळाडू फिन एलन (Finn Allen) सोबत बँगलोरने करार केला आहे. 21 वर्षांच्या एलनला बँगलोरने जॉश फिलिप (Josh Phillipe) ऐवजी टीममध्ये घेतलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 11 मार्च : आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू होण्याआधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) त्यांच्या टीममध्ये नव्या खेळाडूला सामील करून घेतलं आहे. न्यूझीलंडचा आक्रमक खेळाडू फिन एलन (Finn Allen) सोबत बँगलोरने करार केला आहे. 21 वर्षांच्या एलनला बँगलोरने जॉश फिलिप (Josh Phillipe) ऐवजी टीममध्ये घेतलं आहे. बिग बॅश लीगमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकणाऱ्या जॉश फिलीपने आयपीएलमधून नाव मागे घेतलं आहे, पण याचं कारण अजून समजू शकलेलं नाही.

न्यूझीलंडचा खेळाडू असलेल्या फिन एलनने अजून एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेली नाही. त्याने स्थानिक क्रिकेटमध्येही 20 लिस्ट ए आणि 13 टी-20 मॅच खेळल्या आहेत. या छोट्याशा करियरमध्ये त्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. बँगलोरच्या टीमने त्याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. ऑकलंडच्या या खेळाडूने 13 टी-20 मॅचमध्ये 48 पेक्षा जास्तच्या सरासरीने 537 रन केले आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही 180 पेक्षा जास्त आहे.

विराट कोहलीच्या टीमसाठी एलनला टीममध्ये घेणं फायद्याचा सौदा ठरू शकतो. आपल्या आक्रमक बॅटिंगने तो बँगलोरच्या मधल्या फळीला आणखी मजबूत करू शकतो. जॉश फिलीपने 2020 साली बँगलोरकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं, पण त्याला यश आलं नाही. फिलीपला मागच्या मोसमात फक्त 78 रन करता आले.

बँगलोरची टीम

विराट कोहली, एबी डिविलियर्स, युझवेंद्र चहल, देवदत्‍त पडिक्‍कल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्‍मद सिराज, नवदीप सैनी, एडम झम्‍पा, शाहबाज अहमद, फिन एलेन, केन रिचर्डसन, पवन देशपांडे,ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरुद्दीन, काइल जेमिसन, डॅनियल ख्रिश्चन, सुयश प्रभुदेसाई, केएस भरत

First published:

Tags: Cricket news, IPL 2021, RCB, Sports, Virat kohli