मुंबई, 12 जून : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या मीडिया राईट्सच्या (IPL Media Rights) ई ऑक्शनची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या अमेरिकेतील नॅशनल फुटबॉल लीग (NFL), इंग्लिश प्रीमियर लीग (EPL) आणि अमेरिकन बेसबॉलनंतर आयपीएलच्या एका सामन्याची किंमत आहे. या लिलावानंतर दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची बीसीसीआयला आशा आहे. या लिलावातून दिग्गज ई कॉमर्स कंपनी अमेझॉननं माघार घेतली आहे. त्यानंतर वायकॉम, डिज्नी हॉटस्टार झी आणि सोनी या बड्या कंपन्यांमध्ये चुरशीची लढत आहे. यापूर्वी स्टार इंडिया कंपनीनं 2018 ते 20022 या कालावधीसाठी मीडिया राईट्स खरेदी केले होते. स्टार इंडियानं यासाठी झालेल्या जागतिक लिलावात 16, 347 कोटींची बोली लावली होती. बीसीसीआयनं यंदा आधार मुल्य 32, 890 कोटी निश्चित केले आहे. बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘सध्या एनएफएलमध्ये एका मॅचसाठी ब्रॉडकास्टर 17 मिलियन डॉलर देतात. ही कोणत्याही स्पोर्ट्स लीगमधील सर्वाधिक किंमत आहे. इंग्लिश प्रीमियर लीगमधील एका मॅचची किंमत 11 मिलियन डॉलर आहे. मेजर लीग बेसबॉल स्पर्धेतील एका मॅचची किंमतही साधारण तितकीच आहे.मागील पाच वर्षांच्या कालावधीत आयपीएलमधील एका मॅचमधून 9 मिलियन डॉलरची कमाई झाली आहे. या ऑक्शननंतर बीसीसीआयला प्रत्येक मॅचसाठी 12 मिलियन मिळतील अशी आहे,’ असं त्यांनी सांगितलं. या ऑक्शननंतर आयपीएल सर्वात महागड्या लीगच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येईल असा बीसीसीआयचा अंदाज आहे. IPL मधील रोहितच्या संकटमोचकानं दूर लोटला पैसा, वाचा का घेतला निर्णय 90 कोटी युझर्ससाठी चुरस यंदा आयपीएल स्पर्धेच्या ब्रॉडकास्ट अधिकारासह डिजिटल अधिकारांसाठीही वेगळी बोली लागणार आहे. डिजिटल हक्कांसाठी टेलिव्हिजन हक्कांपेक्षा अधिक बोली लागेल असा अंदाज आहे. ‘2024 पर्यंत देशामध्ये 90 कोटी इंटरनेट युझर्स होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे डिजिटल हक्क हे अधिक महत्त्वपूर्ण झाले आहेत,’ असे शहा यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







