दिल्लीच्या शाहीनबागमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध नोंदवण्यासाठी जवळपास तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू होतं. कोरोनाच्या या संकटातही आंदोलनकर्ते रस्त्यावर बसले होते. शनिवारी आंदोलनकर्त्यांमध्ये दोन गट तयार झाले आणि त्यांच्यात वादही झाला होता. कोरोनाव्हायरसच्या संकटात रस्त्यावर उतरायचं की नाही? यावर दोन घटांमध्ये संघर्ष झाला होता. शाहीन बागच्या एका गटाचं म्हणणं होतं की ते पंतप्रधान मोदींच्या कोरोना विषाणूविरूद्ध लढण्याच्या मोहिमेस पाठिंबा देतील, तर दुसरा गट म्हणत होता की काहीही झाले तरी आम्ही रस्त्यावर उभे राहू. यामुळे शनिवारी दोन्ही गटात भांडण झालं. मात्र नंतर दोन्ही गटांना पटवून प्रकरण मिटविण्यात आलं होतं दिल्ली पोलिसांनी शनिवारी इंडिया इस्लामिक सेंटर इथे शाहीनबागच्या निदर्शकांशी बैठक घेतली होती. इथे दिल्ली पोलिसांनी कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता जनतेनं आंदोलन संपण्याचं आवाहन केलं होतं. डीसीपी दक्षिण पूर्वसह दिल्ली पोलिसांचं अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. विनंती करूनही आंदोलन मागे घेण्यात न आल्यामुळे अखेर पोलिसांनी कारवाई करत शाहीनबाग रिकामी केली आहे.दिल्ली के शाहीन बाग में प्रदर्शनकारियों पर कार्रवाई, पुलिस ने टेंट हटाने शुरु किए.@jaspreet_k5 pic.twitter.com/onYzzHfZOx
— News18 India (@News18India) March 24, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.