मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जगभरातील अशा लॅब जिथे कोरोनासारख्या महाभयंकर व्हायरसवर सुरू आहेत प्रयोग

जगभरातील अशा लॅब जिथे कोरोनासारख्या महाभयंकर व्हायरसवर सुरू आहेत प्रयोग

कोरोनाव्हायरस (Coronavirus) पसरल्यानंतर व्हायरसवर प्रयोग करणारी चीनची लॅब (Lab) समोर आली.

कोरोनाव्हायरस (Coronavirus) पसरल्यानंतर व्हायरसवर प्रयोग करणारी चीनची लॅब (Lab) समोर आली.

कोरोनाव्हायरस (Coronavirus) पसरल्यानंतर व्हायरसवर प्रयोग करणारी चीनची लॅब (Lab) समोर आली.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 13 एप्रिल : कोरोनाव्हायरस (coronavirus) पसरल्यानंतर व्हायरसवर प्रयोग करणारी चीनची लॅब समोर आली. मात्र फक्त चीनच नव्हे तर असे कित्येक देश आहेत, जिथे असे कोरोआनासारखे महाभयंकर व्हायरस आहेत. Virus, Bacteria यांच्यावर अभ्यास करणा-या 4 लेव्हलच्या लॅब असतात. बायोसेफ्टी लेव्हल (BSL) नुसार या लॅबचं वर्गीकरण केलं जातं. BSL 1 - सर्वात सुरुवातीची लॅब जिथे कमी धोकायदायक असे व्हायरस असतात. BSL 2 - इथे असे व्हायरस असतात, जे आजार पसरवू शकतात मात्र त्यांच्यावर उपचार शोधलेला आहे. BSL 3 - इतर देशातून आलेल्या नव्या व्हायरसवर काम केलं जातं, कोरोनाव्हायरसही याच श्रेणीतील आहे. या लॅबमध्ये काम करणं अतिधोकायदायक असतं. बहुतेक देशांमध्ये अशा लॅब सरकारी संस्थेप्रमाणे रजिस्टर असतात. पुण्यातील भारतीय व्हायरोलॉजी संस्थाही याच श्रेणीत येतं. BSL 4 - ही सर्वात शेवटची आणि दुर्लभ अशी श्रेणी आहे. इथे असेच व्हायरस असतात ज्यांच्यावर उपचार उपलब्ध नाहीत आणि ते जीवघेणेही असतात. ही लॅब लोकवस्तीपासून खूप दूर असते जेणेकरून लोकांवर त्याचा परिणाम होणार नाही. 'या' देशात CoronaVirus ला दूर ठेवण्यासाठी वापरला जातो परफ्युम चीनमधील वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (Wuhan institute of virology) सर्वांनाच परिचयाची झाली आहे. याच लॅबमध्ये कोरोनाव्हायरसबाबत रिसर्च सुरू होता आणि इथूनच हा व्हायरस पसरला, असा संशय व्यक्त केला जातो आहे. अमेरिकेतल्या Government Accountability Office (GAO) ने दिलेल्या माहितीनुसार, फक्त अमेरिकेतच लेव्हल 4 च्या 15 लॅब आहेत. यामध्ये कॅनडातील नेशनल मायक्रोबायोलॉजी (National microbiologist lab - NML) प्रमुख आहे. दुसरी टेक्सास बायोमेडिकल रिसर्च इन्स्टिट्युटदेखील (Texas biomedical research institute) याच श्रेणीतील लॅब आहे. 1941 साली बनलेल्या या लॅबमध्ये विविध व्हायरसवर सातत्याने संशोधन सुरू आहे. रद्द झालेल्या लग्नाची कथा! कोरोनामुळे बोहोल्यावरून नवरदेव रुग्णालयात तर वऱ्हाडी रशियातील स्टेट रिसर्च सेंटर ऑफ व्हायरोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी व्हेक्टरमध्येही (state research center of virology and biotechnology VECTOR) उपचार नसलेले आजार पसरवणा-या व्हायरसवर काम केलं जातं. संकलन, संपादन - प्रिया लाड
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या