मराठी बातम्या /बातम्या /देश /

आज पुन्हा वाढल्या Petrol-Diesel च्या किंमती, वाचा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर

आज पुन्हा वाढल्या Petrol-Diesel च्या किंमती, वाचा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर

ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी राजधानी दिल्लीत सरकारी पेट्रोलच्या (Petrol Prices) दरात प्रतिलिटर 5 पैशांची वाढ केली आहे.

ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी राजधानी दिल्लीत सरकारी पेट्रोलच्या (Petrol Prices) दरात प्रतिलिटर 5 पैशांची वाढ केली आहे.

ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी राजधानी दिल्लीत सरकारी पेट्रोलच्या (Petrol Prices) दरात प्रतिलिटर 5 पैशांची वाढ केली आहे.

नवी दिल्ली, 29 जून : आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Prices Today) मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी राजधानी दिल्लीत सरकारी पेट्रोलच्या (Petrol Prices) दरात प्रतिलिटर 5 पैशांची वाढ केली आहे. तर डिझेलच्या (Diesel Prices) किंमतीत प्रतिलिटर 13 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला एका लिटर पेट्रोलसाठी आता 80.43 रुपये द्यावे लागणार आहेत. तर, एक लिटर डिझेलची किंमत 80.53 रुपये असणार आहे. खरंतर, रविवारी तेलाच्या किंमतीत सतत होणारी वाढ थांबली होती. पण पुन्हा किंमती वाढल्या आहेत.

जाणून घ्या या शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Price on 29 June 2020)

दिल्ली- पेट्रोल 80.43 रुपये आणि 80.53 रुपये लिटर आहे.

मुंबई- पेट्रोलचे दर 87.19 रुपये आणि डिझल 78.83 रुपये लिटर आहे.

कोलकाता- पेट्रोल 82.10 रुपये आणि डिझल 75.64 रुपये लिटर.

चेन्नई- पेट्रोल 83.63 रुपये आणि डिझलचे दर 77.72 रुपये लिटर आहे.

कोरोनाची 3 नवी लक्षणं आली समोर, त्रास जाणवला तर तात्काळ करा COVID-19 टेस्ट

अशाप्रकारे तपासाल पेट्रोल-डिझेलचे नवे भाव

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.

मस्जिदमध्येच उभारलं ऑक्सिजन सेंटर, सर्व जाती धर्मातील रुग्णांना मिळतो उपचार

दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. 23 दिवसांत पेट्रोलची किंमत 9.17 रुपयांनी तर डिझेलची किंमत 10.90 रुपयांवर गेली आहे.

संपादन- रेणुका धायबर

First published:

Tags: Mumbai petrol, Petrol and diesel price