तिरुवनंतपुरम (केरळ), 06 जून : केरळ (Keral) मध्ये गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातल्याने तिचा अंत झाल्याची घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पण या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अननसात नाही तर नारळामध्ये फटाके भरण्यात आल्याचं आरोपींनी म्हटलं आहे. ज्यामुळे हत्तीणीचा दुर्देवी मृत्यू झाला. मन्नारकाडचे वन्यजीव संरक्षण अधिकारी सुनील कुमार हे या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींची चौकशी करत आहेत. त्यातून हा खुलासा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेचा तापस करत असलेले वन विभागाचे अधिकारी आरोपी विल्सन (40) ला त्या ठिकाणी घेऊन गेले जिथे नारळामध्ये फटाके भरण्यात आले होते. आतापर्यंतच्या तपासानुसार, आणखी दोघांनी आरोपीची मदत केली होती. जे आता फरार असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा रबरच्या शेतीमध्ये काम करतो. तपासात समोर आलं की, हे लोक आपल्या शेताचं रक्षण करण्यासाठी फळांमध्ये फटाके भरून ठेवतात, त्याने जंगली जनावरांना घाबरवण्यास मदत होते. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हत्तीणीने हे फटाक्यांनी भरलेलं नारळ स्वत: खाल्लं की तिला ते खाण्यासाठी देण्यात आलं याचा शोध लागणं. पण नाराळलाती फटाके खाल्ल्यामुळे हित्तीणीच्या चेहऱ्याला प्रचंड जखमा झाल्या होत्या. ती जेवण तर सोडाच पण पाणीदेखील पिऊ शकत नव्हती. वेदनांनी ग्रासलेल्या या हत्तीणीला काहीच कळलं नाही, तेव्हा ती वेलीयार नदीत उभी राहिली. वेदना कमी करण्यासाठी संपूर्ण वेळ फक्त पाणीच पित होती. पण अखेर या वेदनांनी तिचा मृत्यू झाला. मुंबईत टँकर आणि पल्सरचा भीषण अपघात, आगीत होरपळल्याने तरुणाने जागीच सोडला जीव काय आहे संपूर्ण प्रकरण ही हत्तीणी अन्नाच्या शोधात भटकत होती, 25 मे रोजी जवळच्या गावात आल्यानंतर तिला मुलांनी खायला दिलं. गर्भवती असल्यानं काहींना तिला फळ दिली. मात्र या गावातील मुलांनी फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिले. अननस खाताना अचानक फटाक्यांचा स्फोट झाला. ज्यामुळे हत्तीणीचा जबडा कापला गेला आणि दातही तुटले. वेदनांनी ग्रासलेल्या या हत्तीणीला काहीच कळलं नाही, तेव्हा ती वेलीयार नदीत उभी राहिली. वेदना कमी करण्यासाठी संपूर्ण वेळ फक्त पाणीच पित होती. हत्तीणीला एवढ्या वेदना होत होत्या की ती तीन दिवस फक्त नदीत उभी होती. मात्र नदीतच तिचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्तीणीचं वय ते 14-15 वर्ष होत. हत्तीणीला योग्य वेळेत मदत मिळाली असती तरी तिचे प्राण वाचले असते. हत्तीणीची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी त्याचा बचाव करण्यासाठी दाखल झाले. पण ती पाण्याबाहेर न पडल्याने शनिवारी तिचा मृत्यू झाला. फेसबुक पोस्टमुळं आलं प्रकरण समोर वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले की ही मादी हत्ती अन्नाच्या शोधात जंगलातून जवळच्या खेड्यात फिरत होती. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की हत्तीणी जखमी झाल्यानंतर गावातून पळून गेली पण कोणालाही काही केलं नाही. मोहन कृष्णन यांनी या भावनिक पोस्टमध्ये, गंभीर जखमी झाली परंतु असे असूनही तिने कोणाचे नुकसान केले नाही आणि तिच्यावर हल्ला केला. मानवांवर विश्वास ठेवल्यामुळे तिला ही शिक्षा मिळाली. संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







