कोरोनाशी लढा यशस्वी, कल्याणमधील 3 वर्षांच्या चिमुकलीनं केली महासंकटावर मात

कोरोनाशी लढा यशस्वी, कल्याणमधील 3 वर्षांच्या चिमुकलीनं केली महासंकटावर मात

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 6 जण कस्तुरबामध्ये उपचार घेत होते. त्यापैकी दोन जणांनी यशस्वी लढा देत पूर्ण बरे झाले आहेत.

  • Share this:

कल्याण, 27 मार्च : देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 694 वर पोहोचली असून आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. या महामारीला धीरानं तोंड देत कल्याणमधील 03 वर्षांच्या चिमुकलीनं कोरोनासोबत यशस्वी लढा देऊन पुन्हा आपल्या घरी परतली आहे. या चिमुकलीवर 14 दिवस कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. या चिमुकलीचे वडील कंपनीच्या कामानमित्तानं युएईमध्ये गेला होता. जगभरात कोरोनाचं थैमान सुरू असतानाच ते कंपनीच्या कामानिमित्तानं परदेशात अडकले होते. परदेशातून परत आल्यावर वडील आणि आई दोघांनाही कोरोना झाल्याच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना कस्तुरबामध्ये उपचारासाठी दाखळ करण्यात आलं. त्यानंतर 03 वर्षांच्या चिमुकलीच्याही काही टेस्ट करण्यात आल्या तिला क्वारंटाइन कऱण्यात आलं होतं. तिच्यावर उपचार सुरू होते. या उपचारानंतर पुन्हा एकदा चाचण्यांमध्ये निगेटीव्ह रिपोर्ट आल्यानं तिला नातेवाईकांकडे सोपवण्यात आलं आहे. या 03 वर्षांच्या चिमुकलीनं कोरोनासोबतचा लढा यशस्वीपणे लढल्यानं तिचं कौतुक केलं जात आहे. तिच्या आई-वडिलांवर अद्यापही कस्तुरबामध्ये उपचार सुरू आहेत.

हे वाचा-विदर्भात कोरोना पसरला, नागपूर-गोंदियात आढळले 5 रुग्ण!

देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढ आहे. आज कोरोना रुग्णांची संख्या 724वर पोहोचली आहे. वाढत्या आकड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या भारतात 17 वर पोहोचली आहे.तर दुसरीकडे आतापर्यंत कोरोनाचे 66 रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ही दिलासा देणारी गोष्ट आहे. कस्तुरबा रुग्णालयात 6 रुग्णांवर उपचार सुरू होते त्यापैकी आता 2 जणांना बरं वाटल्यानं घरी सोडण्यात आलं आहे.

हे वाचा-विदर्भात कोरोना पसरला, नागपूर-गोंदियात आढळले 5 रुग्ण!

First published: March 27, 2020, 10:45 AM IST

ताज्या बातम्या