मॉस्को, 11 मे : जगात कोरोनाव्हायरसचे (coronavirus) सर्वाधिक रुग्ण असलेल्या पहिल्या तीन देशांच्या यादीत आता रशियाचा (Russia) समावेश झाला आहे. अमेरिका (america), स्पेन (spain) आणि यूकेनंतर (UK) आता रशियामध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत. एका दिवसात वाढलेल्या आकड्यामुळे रशिया पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आला आहे.
रशियामध्ये गेल्या 24 तासांत 11,656 नवे कोरोनाव्हायरस रुग्ण आढळलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता 221,344 पोहोचली आहे. रशियानं इटलीलाही मागे टाकलं आहे. निम्म्याहून अधिक प्रकरणं आणि मृत्यू फक्त मॉस्को शहरात आहेत. याच शहराला रशियातील कोरोनाचा केंद्रबिंदू म्हटलं जातं, जिथं व्हायरसचा उद्रेक झाला.
हे वाचा - VIDEO: कोरोनाविरोधात 9 देशातील 17 कलाकार एकत्र, भारतीय संगीतातून शांतीचा संदेश
जास्तीत जास्त कोरोना टेस्ट झाल्यानं जास्त प्रकरणांची नोंद झाली असावी, असं रशियन अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. रशियात आतापर्यंत 5.6 दशलक्षपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्यात. दरम्यान आता लॉकडाऊनमध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे, याबाबत निर्णय घेण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन बैठक घेणार आहेत.
हे वाचा - 17 मेनंतर होणार मोठे बदल, मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबत केली चर्चा
जगभरात सध्या कोरोनाव्हायरसचे 4,215,497 रुग्ण आहेत. त्यापैकी सर्वात जास्त 1,369,157 रुग्ण यूएसमध्ये, त्यानंतर स्पेनमध्ये 268,143 आणि यूकेमध्ये 223,060 रुग्ण आहेत. या तिन्ही देशांनंतर इटलीचा क्रमांक होता. मात्र आता इटलीपेक्षा रशियात जास्त रुग्ण झालेत. इटलीमध्ये नव्या रुग्णांची नोंद न झाल्यानं आता रुग्णसंख्या 219,070 आहे.
भारतात कोरोनाला रोखण्यासाठी नवा अॅक्शन प्लॅन
भारतात गेल्या 24 तासांमध्ये COVID-19चे देशात 4,213 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 97 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे देशात रुग्णांची एकून संख्या ही 67,152 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 2,206वर गेला आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढ असल्याने केंद्राचे टास्क फोर्स आता नवी योजना तयार करत असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशातल्या सर्व राज्यांना पुन्हा गाईड लाईन्स पाठविण्यात येणार आहेत.
हे वाचा - कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने हादरलं केंद्र सरकार, तयार होतोय नवा Action Plan
गेल्या 24 तासांमध्ये देशात 1,559 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत रुग्ण बरे होण्याची ही सर्वात मोठी संख्या आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 31.15 असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.
संपादन - प्रिया लाड
हे वाचा - कोरोनाचं थैमान: अमेरिकेत पुढच्या दोन महिन्यात होऊ शकतो 1,37000 जणांचा मृत्यू मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.