नवी दिल्ली, 26 एप्रिल : भारतामध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 56 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1,490 नवीन रुग्ण समोर आले आहेत. संक्रमित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारची चिंता वाढत आहेत. पण या सगळ्यात आता मुंबई एअरपोर्टने म्हटलं आहे की, ते पुन्हा एकदा हवाई सेवा सुरू करण्यासाठी सज्ज आहे. हवाई सेवा सुरू करण्यासाठी चोख बंदोबस्त केल्याचे मुंबई एअरपोर्टकडून सांगण्यात शनिवारी सांगण्यात आलं. विमानतळ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, प्रवासादरम्यान सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईकडून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत. परंतु विमानतळ प्राधिकरणानेही हे स्पष्ट केलं आहे की, एअरलाईन्स कधी सुरू होणार याबद्दल आता काहीच सांगता येत नाही. ‘निर्लज्ज कोण?’ संजय राऊतांनी दिलं नारायण राणे आणि आशिष शेलारांना उत्तर विमानतळावर 1.5 मीटर अंतरावर मार्किंग करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. विमानतळ प्राधिकरणानं किंवा प्रवाश्यांना या अंतरांची विशेष काळजी घेण्याच्या सुचना देण्यात येतील. याशिवाय विमानतळामध्ये प्रवेश करताना कर्मचाऱ्यांची कमीत-कमी चर्चा करा. जेणेकरून त्यांना कोणतीही अडचण होऊ नये. धक्कादायक! डायलेसीसच्या उपचारासाठी गेले आणि रुग्णालयात झाला कोरोना, गमावले प्राण विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांसाठी प्रवासात प्रवाशांना कमी सामान घेऊन प्रवास करण्याची विनंती केली आहे. यासह विमानतळाच्या आवारात सोशल डिस्टंसिंगचं अनुसरण करा आणि गर्दी न करता प्रवास करा अशा सुचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात कोणत्या राज्यात कोरोनामुळे किती लोकांचा मृत्यू, पाहा लेटेस्ट अपडेट संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.