मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

धक्कादायक! डायलेसीसच्या उपचारासाठी गेले आणि रुग्णालयात झाला कोरोना, गमावले प्राण

धक्कादायक! डायलेसीसच्या उपचारासाठी गेले आणि रुग्णालयात झाला कोरोना, गमावले प्राण

डायलेसीस करण्यासाठी नेलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उपचारा दरम्यान त्याला कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

डायलेसीस करण्यासाठी नेलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उपचारा दरम्यान त्याला कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

डायलेसीस करण्यासाठी नेलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उपचारा दरम्यान त्याला कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

बारामती, 26 एप्रिल : कोरोनामुळे राज्यात मृतांचा आकडा वाढत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याता आतापर्यंत 323 रुग्णांचा कोरोना झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात पुण्यातून कोरोना मृत्यूची धक्कादायक बातमी समोर आली आहे. डायलेसीस करण्यासाठी नेलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उपचारा दरम्यान त्याला कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, 66 वर्षीय वृद्ध रूग्णास 16 एप्रिलला उपचारासाठी पुण्यात दाखल केले होते. हा रुग्ण मुळचा बारामतीचा आहे. पण डायलेसीसच्या उपचारासाठी त्यांना पुण्याच्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथे कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या संसर्गामुळे बारामतीतील दोन रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर बारामतीतील कुटुंबांचे 12 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे . आतापर्यंत तब्बल 323 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये शनिवारी 811 नवीन कोरोना रुग्ण समोर आले. एकाच दिवसात ऐवढे रुग्ण वाढण्याचा आकडा मोठा असल्याने ही चिंतेची बाब आहे. राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांचे आकडे आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले असून यामध्ये शनिवारी म्हणजेच 25 एप्रिलला 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नवीन मृत्यू झालेल्यांपैकी मुंबई येथील 13, 4 पुणे महानगरपालिका इथे तर 1 मृत्यू मालेगाव इथे , 1 पुणे ग्रामीणमध्ये, 1 पिंपरी चिंचवडमध्ये, 1 धुळे इथे तर 1 मृत्यू सोलापूर शहरात झाल. दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 1076 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या राज्यात 1,25,393 लोक होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहेत तर 8,124 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यांचे अपडेट मुंबई मनपा - रुग्ण - 5049 मृत्यू - 191 ठाणे - रुग्ण - 717 मृत्यू - 15 पालघर - रुग्ण - 139 मृत्यू - 4 रायगड - रुग्ण - 56 मृत्यू - 1 नाशिक - रुग्ण - 131 मृत्यू - 12 अहमदनगर - रुग्ण - 35 मृत्यू - 2 धुळे - रुग्ण - 25 मृत्यू - 3 जळगाव - रुग्ण - 13 मृत्यू - 2 नंदुरबार- रुग्ण - 11 मृत्यू - 1 पुणे - रुग्ण - 1030 मृत्यू - 73 सोलापूर - रुग्ण - 46 मृत्यू - 4 सातारा- रुग्ण - 29 मृत्यू - 2 कोल्हापूर- रुग्ण - 10 मृत्यू - 0 सांगली- रुग्ण - 26 मृत्यू - 1 सिंधुदूर्ग- रुग्ण - 1 मृत्यू - 0 रत्नागिरी - रुग्ण - 08 मृत्यू - 1 औरंगाबाद - रुग्ण - 50 मृत्यू - 5 जालना - रुग्ण - 2 मृत्यू - 0 हिंगोली - रुग्ण - 8 मृत्यू - 0 परभणी - रुग्ण - 1 मृत्यू - 0 लातूर - रुग्ण - 9 मृत्यू - 0 उस्मानाबाद - रुग्ण - 3 मृत्यू - 0 बीड - रुग्ण - 1 मृत्यू - 0 नांदेड - रुग्ण - 1 मृत्यू - 0 अकोला - रुग्ण - 23 मृत्यू - 1 अमरावती - रुग्ण - 19 मृत्यू - 1 यवतमाळ - रुग्ण - 28 मृत्यू - 0 बुलढाणा - रुग्ण - 21 मृत्यू - 1 वाशिम - रुग्ण - 1 मृत्यू - 0 नागपूर - रुग्ण - 107 मृत्यू - 1 वर्धा - रुग्ण - 0 मृत्यू - 0 भंडारा - रुग्ण - 0 मृत्यू - 0 गोंदिया - रुग्ण - 1 मृत्यू - 0 चंद्रपूर - रुग्ण - 2 मृत्यू - 0 गडचिरोली - रुग्ण - 0 मृत्यू - 0 इतर राज्ये - रुग्ण 25 आणि मृत्यू 2 एकूण - 7628 रुग्ण मृत्यू - 323 संपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या