Home /News /news /

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या Corona रुग्णाच्या कुटुंबियांची चाचणी, सात जणांचा आला रिपोर्ट

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या Corona रुग्णाच्या कुटुंबियांची चाचणी, सात जणांचा आला रिपोर्ट

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांची कोरोना चाचणी झाली.

    मुंबई, 29 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिकेवरून (South Africa)आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेवरून काही प्रवासी मुंबईत दाखल झालेत. या प्रवाशांची तपासणी केली असता एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या प्रवाशी डोंबिवलीमध्ये राहणारा आहे. दरम्यान आता त्याच्या कुटुंबियांचीही कोरोना टेस्ट घेण्यात आली. दरम्यान आता दुसरीकडे दिलासादायक बातमी समोर येतेय, दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांची झाली कोरोना चाचणी करण्यात आली. कुटुंबातील सात जणांची कोरोना चाचणी केली. कुटूंबातील सर्व सात सदस्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसंच रुग्ण राहत असलेल्या महापालिकेनं इमारतीमधील रहिवाशांचे कोरोना टेस्ट घेण्यास सुरुवात केली आहे. केडीएमसी च्या आरोग्य अधिकारी डॉ प्रतिभा पानपाटील यांनी ही माहिती दिली आहे. हेही वाचा- IND vs NZ: अश्विन बनला टीम इंडियाचा सर्वात यशस्वी ऑफ स्पिनर, हरभजनला मागे टाकत रचला इतिहास तसंच खबरदारी म्हणून तातडीने या प्रवाशाची ओमिक्रॉनची चाचणी (Omicron Variant) केली जाणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेकडून देण्यात आली आहे. या प्रवाशाला क्वारंटाइन करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचा केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार असून त्याला ओ मायक्रोनची लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आले 87 जण दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत 87 जण आले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. या सर्वांचं ट्रेसिंग करण्याचं काम सुरु असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. यातील डोंबिवलीमधील दोघे कोरोना पॉझिटिव्ह आलेत. मात्र या दोघांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं आहेत की नाही याची टेस्ट अद्याप बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं. हेही वाचा- WhatsApp वर Video Status असं करा डाउनलोड; पाहा प्रोसेस ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांनीच सतर्क होण्याची गरज आहे. कोविड सेंटर सज्ज आहेत आता ते पुन्हा ॲक्टिव्ह करावे लागणार आहेत. डॉक्टर , नर्स स्टाफ आपल्याकडे असल्याचं त्या म्हणाल्यात. विमानतळाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. बाहेर देशातून आलेल्या व्यक्तींची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि कुटुंबियांची चाचणी केली जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus cases

    पुढील बातम्या