मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /नागपूरात कोरोनाचा उद्रेक; सलग चौथ्या दिवशी चिंता वाढवणारी बातमी

नागपूरात कोरोनाचा उद्रेक; सलग चौथ्या दिवशी चिंता वाढवणारी बातमी

आजपासून दोन दिवसाचे विकेंड लॉकडाऊन असतांना देखील नागरिक मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर निघाल्याचं चित्र आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाऊन नावापुरताच राहिला आहे.

आजपासून दोन दिवसाचे विकेंड लॉकडाऊन असतांना देखील नागरिक मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर निघाल्याचं चित्र आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाऊन नावापुरताच राहिला आहे.

आजपासून दोन दिवसाचे विकेंड लॉकडाऊन असतांना देखील नागरिक मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर निघाल्याचं चित्र आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाऊन नावापुरताच राहिला आहे.

नागपूर, 6 मार्च : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान विदर्भात कोरोनाचा स्फोट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात नागपूरातून 1183 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सक्रिय रुग्णांची संख्याही 10 हजार 743 च्या घरात आहे. (Nagpur corona increasing)

गेल्या अनेक दिवसांपासून नागपूरात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून सलग चौथ्या दिवशी नागपूरात कोरोनाने 1000 चा आकडा पार केला आहे. सक्रिय केसेसचा आकडादेखील 10 हजार 743 च्या घरात आहे. आजपासून दोन दिवसाचे विकेंड लॉकडाऊन असतांना देखील नागरिक मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर निघाल्याचं चित्र आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाऊन नावापुरताच राहिला आहे.

तर अमरावती जिल्हात आज दिवसभरात 631 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आज 806 रुग्णांनी कोरोनावर मात करीत घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 39078 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून आतापर्यंत 31555 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 555 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा-निवडणूक आयोगाचा आदेश, कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरुन हटवा पंतप्रधानांचा फोटो

देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेली ताजी आकडेवारी सर्वांची धडकी भरवणारी आहे. या आकडेवारीनुसार देशातील कोरोना व्हायरस रुग्णांची एकूण संख्या 1,11, 92, 088  इतकी झाली आहे. काळजीची बाब म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये 18, 327 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 108 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. ही गेल्या 36 दिवसांमधील सर्वात मोठी वाढ आहे. सलग चौथ्या दिवशी उपचार करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

First published:

Tags: Corona spread, Nagpur