नवी दिल्ली, 23 मार्च : काही दिवसांपूर्वी परदेशातील पोलिसांनी गुन्हेगारांना सध्या कोरोनाच्या (Coronavirus) संकटात गुन्हे करू नका असं आवाहन केलं होतं. मात्र कोरोनाचं वाढतं संकट किती भयावह आहे हे या गुन्ह्यावरुन समोर येतं. एक तरुणाने रुग्णालयातील कोरोना (Covid -19 Kit) किटची चोरी केल्याची घटना घडली आहे. आता पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की ते त्या चोराला पकडण्यासाठी आमची मदत करावी. या टेस्टची चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यातील फूटेजनुसार तरुण साधारण रात्री 8 वाजता एका स्वास्थ केंद्रावर पोहोचला. त्यावेळी केंद्राची आवराआवर सुरू होती. आरोग्य कर्मचाऱ्यांचं लक्ष नसल्याचं पाहून तो केंद्रात शिरला. समोरच कोरोनाच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी कोरोना किट ठेवल्या होत्या. आरोग्य कर्मचाऱ्यांचं लक्ष नसताना त्याने हळूच तब्बल 29 कोरोना तपासणी किटची चोरी केली आणि पसार झाला. तो बाहेर जात असतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. त्याच्या मदतीने या तरुणाचा शोध सुरू आहे. संबंधित - ‘मी समाजाचा शत्रू आहे, मी घरात थांबणार नाही’ घराबाहेर पडाल तर होईल अशी पंचाईत
A man disguised as a delivery man stole 29 coronavirus testing kits at a health clinic in Arizona. Police are asking the public's help in identifying the man. (Photo: Tuscon Police Department)https://t.co/3Xvagwfzwq pic.twitter.com/G8ZuHzeC0z
— KUTV2news (@KUTV2News) March 22, 2020
पोलिसांनी या तरुणाचा फोटो आपल्या फेसबुकवर पोस्ट केला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार तरुणाचे वय साधारण 30 वर्षे असून उंची 5 फूट 9 इंच असावी. ही घटना अमेरिकेतील टुसकॉन भागातील आहे. सध्या पोलीस नागरिकांच्या मदतीने तरुणाचा शोध घेत आहेत.