Home /News /news /

मायावतींना दिली होती 'ही' ऑफर; राहुल गांधींचा दावा

मायावतींना दिली होती 'ही' ऑफर; राहुल गांधींचा दावा

काँग्रेस पक्षाने बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती (bsp chief mayawati) यांना उत्तर प्रदेशमध्ये युती करण्याची आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्या बोलल्याही नाही, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी शनिवारी केला.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 9 एप्रिल :  काँग्रेस पक्षाने बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती (bsp chief mayawati) यांना उत्तर प्रदेशमध्ये युती करण्याची आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्या बोलल्याही नाही, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी शनिवारी केला. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि पेगासस यांच्याकडून निर्माण होत असलेल्या दबावामुळे मायावती दलितांच्या आवाजासाठी लढत नाही आहेत आणि त्यांनी भाजपला मार्ग मोकळा करुन दिला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. माजी सनदी अधिकारी आणि कांग्रेस नेते के. राजू यांच्या ‘द दलित ट्रूथ: द बैटल्स फॉर रियलाइजिंग आंबेडकर्स विजन’ या पुस्तकाचे प्रकाशन राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात हा खुलासा केला. ईडी, सीबीआयमुळे मायावतींनी ... आज सीबीआय, ईडी आणि पेगाससच्या माध्यमातून राजकीय व्यवस्था नियंत्रित केली जात असल्याचा दावा राहुल यांनी केला. ते म्हणाले, 'आम्ही मायावतीजींना (उत्तर प्रदेश निवडणुकीत) युती करण्याचा, मुख्यमंत्री बनण्याचा संदेश दिला, पण त्या बोलल्याही नाहीत. कांशीरामजी यांनी रक्त आणि घाम गाळून दलितांचा आवाज जगवला. त्यामुळे आम्ही दुखावलो, ही वेगळी बाब आहे. आज मायावती जी म्हणतात की, मी त्या आवाजासाठी लढणार नाही. त्यांनी भाजपला रस्ता मोकळा करुन दिला. याचे कारण म्हणजे सीबीआय, ईडी आणि पेगासस आहे, असा दावा त्यांनी केला. हेही वाचा - कर्नाटकमध्ये हिजाबनंतर आता हलालमुळे नवा वाद! एका आईस्क्रीम ब्रँडच्या वापरावर बंदी घालण्याचं आवाहन ते म्हणाले, जर मी एक रुपया जरी घेतला असता तर मी इथे भाषण देऊ शकलो नसतो. संविधान भारताचे शस्त्र आहे. मात्र, संस्थांविना संविधान नाही. आम्ही इथे संविधान घेऊन फिरत आहोत. तुम्ही आणि आम्ही म्हणत आहोत की संविधानाची रक्षा करायला हवी. मात्र, संविधानाची रक्षा यंत्रणांच्या माध्यमातून होते. आज सर्व यंत्रणा आरएसएसच्या हातात असे म्हणत त्यांनी आरएसएस आणि भाजप देशातील यंत्रणा नियंत्रित करत असल्याचा आरोप केला. महात्मा गांधीवर गोळ्या झाडल्या गेल्या तेव्हापासून संविधानावर हल्ला सुरू झाला होता. दलित आणि त्यांच्यासोबत होणाऱ्या व्यवहारा संबधांत माझे मन जुळले आहे आणि हे तेव्हापासून आहे, जेव्हा मी राजकारणात नव्हतो, असेही ते यावेळी म्हणाले. काही लोक दिवस रात्र विचार करतात की त्यांना सत्ता कशी मिळेल. मी माझा देश त्याप्रमाणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो ज्याप्रमाणे एखाद्या प्रियकराला त्याच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्यायचे असते, असेही ते यावेळी म्हणाले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Politics, Rahul gandhi, UP Election

    पुढील बातम्या