जाहिरात
मराठी बातम्या / देश / कर्नाटकमध्ये हिजाबनंतर आता हलालमुळे नवा वाद! एका आईस्क्रीम ब्रँडच्या वापरावर बंदी घालण्याचं आवाहन

कर्नाटकमध्ये हिजाबनंतर आता हलालमुळे नवा वाद! एका आईस्क्रीम ब्रँडच्या वापरावर बंदी घालण्याचं आवाहन

कर्नाटकमध्ये हिजाबनंतर आता हलालमुळे नवा वाद! एका आईस्क्रीम ब्रँडच्या वापरावर बंदी घालण्याचं आवाहन

Halal Controversy: कर्नाटकातील ‘हलाल’ मांसविरोधी मोहिमेनंतर, बजरंग दल आणि श्री राम सेनेच्या नेतृत्वाखालील उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी आता मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

    बंगळुरू, 8 एप्रिल : कर्नाटकमध्ये हिजाबनंतर आता हलालमुळे मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. हलालच्या वादाने आता कर्नाटकातील आईस्क्रीमच्या व्यवसायालाही वेठीस धरलं आहे. गुरुवारी (7 एप्रिल 2022) सोशल मीडियावर काही मेसेज व्हायरल झाले होते. या मेसेजमध्ये काही लोक विशिष्ट ब्रँडच्या आईस्क्रीमवर बहिष्कार (Boycott) टाकण्यात यावा असं आवाहन करत होते. त्यामुळे मुस्लिम व्यापारी आणि विक्रेत्यांच्या एका गटाने गुरुवारी म्हैसूरमध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे रिचेन ल्हामो यांची भेट घेतली. हिजाब, हलाल मांस आणि मशिदीत लाऊडस्पीकरच्या वापरावरून झालेल्या वादांनंतर आता कर्नाटकमध्ये मुस्लिम समुदायाला जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जातं असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, या विशिष्ट ब्रँडच्या आईस्क्रीमला (Ice-cream Brand) काही वर्षांपूर्वी हलाल प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. झालं असं की काही वर्षांपूर्वी एका मोहिमेअंतर्गत या कंपनीवर एक आरोप केला गेला होता. या आईस्क्रीममध्ये वापरले जाणारे घटक एका विशिष्ट समुदायाने सेवन करण्यासाठी योग्य नाहीत असं आरोपकर्त्याने म्हटलं होतं. त्यामुळे या कंपनीने हे प्रमाणपत्र घेतलं होतं. या समुदायाच्या महिलांवर सार्वजनिकपणे बलात्कार करेन; महंताच्या वादग्रस्त Video मुळे खळबळ कंपनीला मिळाली होती धमकी गेल्या काही दिवसांत कर्नाटकातील मंगळुरू, उडुपी यांसारख्या शहरांत आईस्क्रीम पार्लरला (Ice-cream Parlor) धमक्या देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या आईस्क्रीम पार्लरने एका महिन्याच्या आत हलाल प्रमाणपत्र काढून घ्यावं अन्यथा त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात येईल अशी धमकी या पार्लरला आल्याचं सांगण्यात येत आहे. या धमक्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. यातील एका ब्रँडने आपल्या वेबसाईटवर आपलं आईस्क्रीम आणि इतर उत्पादनं पूर्णपणे शाकाहारी आहेत असं स्पष्ट केलं आहे. तसंच आईस्क्रीम तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारे अंड्यांचा वापर केला जात नाही, असंदेखील या ब्रँडने स्पष्ट केले आहे. हिजाब, हलाल आणि वाद कर्नाटकातील ‘हलाल’ मांसविरोधी मोहिमेनंतर बजरंग दल आणि श्रीराम सेनेच्या नेतृत्वाखालील उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी आता मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. श्रीराम सेनेचे संयोजक प्रमोद मुतालिक यांनी एक व्हिडिओ जारी करून म्हटले की, मशिदींमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरवर बंदी घालावी. तसेच ध्वनिप्रदूषणाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन करण्यात यावं, अशी हिंदू संघटनांची मागणी आहे. या संदर्भात श्रीराम सेनेने संबंधितांना आवाहनदेखील केलं होतं. परंतु, त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही असा आरोपही मुतालिक यांनी या व्हिडिओमध्ये केला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: karnataka
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात