बर्मिंगहॅम, 31 जुलै : कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात भारताच्या बिंदियारानी देवी (Bindyarani Devi) या तरुणीने पहिले पदक जिंकले. मणिपूरच्या या 23 वर्षीय महिला वेटलिफ्टरने 55 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. तिने एकूण 202 किलो वजन उचलले. भारताचे कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतील हे चौथे पदक असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमधून आलेली आहेत. यापूर्वी महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने सुवर्णपदक जिंकले होते. तर संकेत महादेव सरगरने रौप्य आणि गुरुराज पुजारीने कांस्यपदक पटकावले. भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले असून पदकतालिकेत आपण आठव्या क्रमांकावर आहे. बिंदियारानी देवीने स्नॅचच्या पहिल्याच प्रयत्नात 81 किलो वजन उचलले. तिने दुसऱ्या प्रयत्नात 84 किलो तर तिसऱ्या प्रयत्नात 86 किलो वजन उचलले. स्नॅचनंतर ती एकूण वजन उचलण्यात तिसरी होती. या भारतीय वेटलिफ्टरने क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्याच प्रयत्नात 110 किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात तिने 114 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये अपयश आले. तिसऱ्या प्रयत्नात तिने 116 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. हा सामन्याचा एकूण शेवटचा प्रयत्न होता. हा एकूण गेम्समधील विक्रमही आहे. तिने गेल्या वर्षी कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. हे वाचा - Asia Cup महिन्याभरात, तारीख-ठिकाणाची घोषणा, या दिवशी भारत-पाकिस्तान महामुकाबला! नायजेरियाला सुवर्ण मिळाले - नायजेरियाच्या अदिजात हिने सुवर्णपदक जिंकले. सध्याच्या खेळामध्ये नायजेरिया देशाला मिळालेले हे पहिलेच पदक आहे. अदिजात हिने स्नॅचमध्ये 92 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 111 किलोसह एकूण 203 किलो वजन उचलले. इंग्लंडच्या फेरो मोरोने 89 आणि 109 किलोसह 198 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकले. हे वाचा - पाकिस्तान T20 World Cup जिंकणार नाही! रिकी पॉण्टिंगने सांगितलं कारण दरम्यान, इतर खेळांमध्ये चमकदार कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. महिला बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. म्हणजेच पदकापासून ती एक विजय दूर आहे. दुसरीकडे, भारतीय महिला हॉकी संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. संघाने वेल्सचा 3-1 असा पराभव केला. उद्यापासून पुरुष संघ आपल्या विजयी मोहिमेला सुरुवात करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.