तीन बायका असल्यामुळे संपत्तीवरून झाला वाद, मुलगा आणि सुनेनं असा काढला वडिलांचा काटा

तीन बायका असल्यामुळे संपत्तीवरून झाला वाद, मुलगा आणि सुनेनं असा काढला वडिलांचा काटा

पहिल्या पत्नीच्या मुलानं आणि सुनेनं मालमत्तेत वाटा मिळावा यासाठी कट रचला आणि त्यानंतर राधेश्याम नावाच्या इसमाला ठार मारलं, असं तपासात समोर आलं आहे.

  • Share this:

मिर्जापूर, 02 मे : सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. या संसर्गाचा फैलाव थांबवण्यासाठी सगळ्यांना घरात बसण्याची वेळ आली आहे. पण तरीदेखील देशात गुन्हे होण्याचा प्रकार काही थांबत नाहीये. उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर इथून पोलिसांनी खळबळजनक हत्याकांड उघडकीस आणला आहे. लॉकडाऊन असताना संपत्तीसाठी व्यक्तीची हत्या करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मृताच्या पहिल्या पत्नीच्या मुलानं आणि सुनेनं मालमत्तेत वाटा मिळावा यासाठी कट रचला आणि त्यानंतर राधेश्याम नावाच्या इसमाला ठार मारलं, असं तपासात समोर आलं आहे. हा प्रकार घडवणाऱ्या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सर्वांना तुरूंगात पाठवण्यात आलं आहे.

हत्येचा पर्दाफाश

मिर्झापूरच्या विंध्याचल भागात 11 एप्रिल 2020 रोजी राधेश्याम मौर्य हत्याकांडामुळे संपूर्ण भागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिलला संशयी समजलं होतं. पण आता पोलिसांचं म्हणणं आहे की, राधेश्यामच्या हत्येप्रकरणी त्याचा मुलगा आणि सून यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन बंदूक, एक रिव्हॉल्व्हर आणि काडतुसं जप्त केली आहेत.

पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा, आता शहरातच होणार कोरोनाची चाचणी

पोलिसांनी सांगितलं की, राधेश्याम मौर्य त्याच्या किराणा दुकानात बसला असता मोटारसायकलवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्याला गोळ्या घालून ठार केलं. खुनाचं कारण म्हणजं मालमत्तेचा वाद. तर राधेश्यामनं तीन विवाह केले होते हेदेखील हे कारण आहे.

मुलगा आणि सूनच निघाले खुनी

राधेश्याम यांनी 40 वर्षांपूर्वी पहिली पत्नी सीता देवी हिला सोडलं. जी आर्यसमाजाचा आश्रम लोहंडी इथे राहते. राधेश्याम यांचा मुलगा ताजन उर्फ राजू मौर्य सीतादेवीचा मुलगा आहे. मृताने आपला मोठा भाऊ माधवप्रसाद यांची हत्या केली होती व नंतर त्याने पत्नी कलावतीशी लग्न केलं होतं. त्यांना राजेंद्र नावाचा मुलगा आहे.

दुसर्‍या पत्नीच्या निधनानंतर मृतक राधेश्यामचं लग्न सोनभद्र इथे राहणाऱ्या सुगवंतीशी झालं आणि नंतर त्याने तिसरा विवाह देखील केला. यासगळ्यामुळे या कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरू झाला. यातूनच मुलगा आणि सूनेनं मिळून राधेश्याम यांची हत्या केली.

श्रमिक स्पेशल ट्रेनसाठी रेल्वेनं जारी केले निर्देश, फक्त हेच लोक करणार प्रवास

First published: May 2, 2020, 1:38 PM IST
Tags: murder

ताज्या बातम्या