Home /News /news /

चीनमधील लेखिकेवर देशद्रोहाचा आरोप; लॉकडाऊनदरम्यान अनुभव शेअर केले म्हणून...

चीनमधील लेखिकेवर देशद्रोहाचा आरोप; लॉकडाऊनदरम्यान अनुभव शेअर केले म्हणून...

लॉकडाऊन दरम्यान त्यांनी लिहिलेल्या या डायरीच्या प्रकाशनाला प्रकाशकांनी नकार दिला. प्रशासनाने त्यांच्या नव्या आणि जुन्या पुस्तकांची छपाई देखील बंद केली.

    नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) धुमाकूळ घालत आहे. भारतात देखील पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सर्वात आधी कोरोनाचे संकट चीनमध्ये (China) आले होते. अनेक जाणकारांच्या मते चीनमधील वुहान शहरातून कोरोना संक्रमण सुरु झाले होते. जानेवारीमध्येच वुहानमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात संक्रमित नागरिक सापडल्याने चीनमध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यावेळी चीनमधील प्रसिद्ध लेखिका फांग फांग यांनी लॉकडाऊन काळातील आपले अनुभव नागरिकांशी शेअर केले होते. लॉकडाऊन दरम्यान, फांग फांग प्रत्येक दिवशी आपले अनुभव ऑनलाईन डायरीप्रमाणे शेअर करत असतं. त्यांच्या या अनुभवांमुळे नागरिकांना हिंमत मिळत असे. परंतु काही काळानंतर त्यांना देशद्रोही म्हटले जाऊ लागले. या ऑनलाईन डायरीमध्ये त्यांनी सरकारवर टीका केली होती. या डायरीमध्ये त्यांनी या काळातील आपले अनुभव शेअर करण्याबरोबरच सरकारवर देखील टीका केली होती. सुरुवातीला ऑनलाईन डायरीचे कौतुक फांग फांग यांचे खरे नाव वांग फांग असून त्यांचे वय 65 वर्ष आहे. चीनमधील विबो हे ट्विटरसारखी ऑनलाईन सोशल मीडिया असून या आपली ऑनलाईन डायरी शेअर करत असतं. बीबीसीशी बोलताना फॅंग फाँग म्हणाल्या,स्वतःला  सक्रिय ठेवण्यासाठी त्या डायरी लिहायच्या आणि लॉकडाऊन दरम्यान तिला आसपासच्या वातावरणाबद्दल काय वाटते काय वाटते हे सांगत असे.  लेखक आणि जागरूक नागरिक म्हणून, फॅंग फॅन यांनी आपल्या डायरीतून लोकांना सांगितले की एकटे राहणे कसे वाटते. इतक्या नागरिकांचा मृत्यू होताना पाहणे कसे वाटते तसेच या काळात प्रशासन योग्य काम करत नसेल तर कसे वाटते याविषयी त्या आपल्या डायरीमध्ये लिहीत असतं. सुरुवातीला त्यांच्या या डायरीचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असे. चीनच्या माध्यमांनी देखील त्यांचे लेखन प्रेरणादायी असल्याचे म्हटले. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची डायरी लोकप्रिय झाल्यानंतर त्यांच्या लेखांचे इंग्रजीमध्ये भाषांतर होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्या या डायरीला चीनमध्ये विरोध होण्यास सुरुवात होऊंन त्यांना देशद्रोही म्हटले जाऊ लागले. हे ही वाचा-चीन सोबत तणाव कायम असताना लडाखमध्ये भारतीय लष्कारापुढे आता दुसरं संकट देशद्रोहाचा ठपका आणि धमक्या लॉकडाऊन दरम्यान त्यांनी लिहिलेल्या या डायरीच्या प्रकाशनाला प्रकाशकांनी नकार दिला. प्रशासनाने त्यांना एकप्रकारे शत्रू समजून त्यांच्या नवीन आणि जुन्या पुस्तकांची छपाई देखील बंद केली. फांग-फांग यांनी याविषयी सांगितले, लेखकाची य पद्धतीने व्यवहार होणे खूपच चुकीचे आहे. सरकारची बाजू न घेता मी नागरिकांप्रती सहानुभूती व्यक्त केल्याने असे होऊ शकत असल्याचे त्यांनी म्हटले. याचबरोबर त्यांना शिव्यांचे मेसेज आणि धमक्यादेखील येत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे त्या खूप चिंतेत असून यामधून त्या माघार घेणार नसून कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. न घाबरता आपला मुद्दा मांडणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: China

    पुढील बातम्या