बीजिंग, 08 मार्च : शनिवारी चीनच्या गुआंगझौ शहरात हॉटेलची इमारत कोसळल्यामुळे डझनभर लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. सरकारी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूची लागण झालेल्या संशयित व्यक्तीला वेगळं ठेवण्यासाठी या हॉटेलचा वापर केला जात होता. इथल्या अधिकृत माध्यमांच्या माहितीनुसार, फुझियान प्रांतामधील 80 खोल्यांच्या हॉटेलची इमारत स्थानिक वेळ संध्याकाळी 7.30 च्या सुमारास कोसळली. अनेक तासांच्या बचावाच्या प्रयत्नांनंतर 38 लोकांना ढिगाऱ्याखाली बाहेर काढण्यात आले. अद्याप 30 लोक अडकल्याचे बोलले जात आहे.
हॉटेलमधील लोकांना वेगळं ठेवलं होतं
वृत्तसंस्था शिन्हुआच्या म्हणण्यानुसार, अनेक लोक अजूनही मलब्याखाली दबलेले आहेत. एजन्सीनं म्हटलं आहे की, ज्या लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली होती त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं. सिन्हुआच्या म्हणण्यानुसार, बचाव आणि मदत कार्यासाठी 147 जणांची टीम पाठविली गेली आहे आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Latest on hotel collapse in east China's Quanzhou: 49 rescued as of 08:20 am, March 8 (local time). Further rescue is under way https://t.co/eFN3AhHBYe pic.twitter.com/rP3Wgd15jt
— China Xinhua News (@XHNews) March 8, 2020
हे वाचा - Yes Bank चे सीईओ राणा कपूर यांना ईडीने केली अटक
वुहान शहरातून कोरोना विषाणूची झाली लागण
कोरोना विषाणूच्या संसर्गाची लागण चीनच्या वुहान शहरात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाली होती आणि आतापर्यंत जगातील सुमारे साडेतीन हजार लोकांचा बळी गेला आहे. बीजिंगच्या एका न्यूज साइटने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पाच मजली हॉटेलची इमारत कोसळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये या घटनेतील एका साक्षीदाराने सांगितले की, 'मी गॅस स्टेशनवर होतो, तेव्हाच मोठा आवाज ऐकू आला. मी संपूर्ण इमारत कोसळताना पाहिली. तिथे फक्त धूळ दिसत होती आणि काचेचे तुकडे पसरत होते. माझे हात पाय थरथर कापत होते. मी घाबरलो होतो.'
16 people have been rescued after a hotel building collapsed in the city of Quanzhou, east China's Fujian Province, Saturday evening. pic.twitter.com/K897TJUaSu
— China Xinhua News (@XHNews) March 7, 2020
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी क्रेन आणि उत्खनन करणारी 36 आपत्कालीन बचाव वाहनं, अग्निशमन दलाच्या 67 गाड्या, 15 रुग्णवाहिका आणि 700 हून अधिक अग्निशामक कर्मचारी, डॉक्टर आणि इतर बचाव कर्मचारी उपस्थित आहे. मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे.